शेतकऱयांच्या समस्या सोडवणारः भरत थोरात (Video)

वाघाळे, ता. 30 ऑगस्ट 2018 (तेजस फडके): शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांना रासायनिक खतांची टंचाई, बी बियाणांची टंचाई, वाढीव वीज बिले तसेच पीक विमा भरपाई अशा अनेक समस्या आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून या सगळया समस्या सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे, असे शिरुर शिवसेना शेतकरी सेनेचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष भरत थोरात यांनी www.shirurtaluka.com शी बोलताना सांगितले.

शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचे जास्तीत जास्त संघटन करणार असून, शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव (पाटील), अरुण गिरे, जिल्हाप्रमुख रामशेठ गावडे, उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद, तालुका प्रमुख पोपट शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शिवाय, पक्षाने टाकलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे, असेही भरत थोरात त्यांनी सांगितले.
Image may contain: 32 people, people smiling, text

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या