बरसणा-या श्रावणसरी अन् रंगलेली मंगळागौर...

Image may contain: 7 people, people smiling, people standingशिरुर, ता. १ सप्टेंबर २०१८ (प्रतिनीधी) : अधून-मधून कोसळणा-या श्रावण सरी..अन त्यात मंगळागौरीचा जागर करत विविध कार्यक्रमांनी शिरुर शहरात नुकताच मंगळागौरच्या महिलांच्या कार्यक्रमाला एकच रंगत आली.
Image may contain: one or more people and indoor
शिरुर नगरपरिषदेच्यावतीने (दि.२९) रोजी शिरुर नगरपालिकेचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल व नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर नगरपालिका मंगल कार्यालयात मंगळागौर या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Image may contain: one or more people, people on stage and indoor
अधुनमधुन बरसणा-या श्रावण सरी अन त्यात झिम्मा, फुगडी, पिंगा, काटवटकाना, उखाने, प्रश्नमंजुषा, इ.कार्यक्रमांनी महिलांच्या आनंदाला एकच उधान आले. या कार्यक्रमात घेतलेल्या विविध स्पर्धांत यश मिळविलेल्या महिलांना बक्षिसे वाटप करण्यात आली. तसेच या वेळी कचरा वर्गीकरण व प्लॅस्टिकबंदी बाबत प्रबोधन करण्यात आले.

कार्यकमाचे प्रास्ताविक महिला व बालकल्याण च्या उपसभापती अंजली थोरात यांनी केले तर स्वागत व आभार महिला बालकल्याण समिती सभापती सुनिता कुरंदळे यांनी मानले.या कार्यक्रमाला शिरुर नगरपालिकेच्या सर्व महिला नगरसेविका, व शिरुर शहरातील महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या