राष्ट्रवादीच्या शिरुर शहराध्यक्षपदी मुजफ्फर कुरेशी

शिरुर, ता.१ सप्टेंबर २०१८ (प्रतिनीधी) : राष्ट्रवादीच्या शिरुर शहराध्यक्षपदी मुजफ्फर कुरेशी यांची  निवड जाहिर करण्यात आली आहे.त्या संदर्भात त्यांना नियुक्तीचे पञ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी दिले.मुजफ्फर कुरेशी हे शिरुर नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवक असुन त्यांनी सण २००७ ते २०११ या काळात नगरपरिषदेत नगरसेवक म्हणुन काम पाहिले आहे.त्यांनी पाणीपुरवठा,बांधकाम,स्वच्छता व आरोग्य या महत्वांच्या समित्यांवर काम केले असुन शिरुर नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळावर सदस्य म्हणुन काम पाहिले आहे.शिरुर शहर राष्ट्रवादी युवक चे अध्यक्ष म्हणुन तसेच शिरुर शहर राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष म्हणुन यापुर्वी काम केलेले आहे.राष्ट्रवादीच्या स्थापनेपासुन ते पक्षाबरोबर असुन त्यांच्या निवडीनंतर शहरातुन अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.निवडीनंतर बोलताना कुरेशी हे म्हणाले कि, शिरुर शहरात पक्षातील ज्येष्ठ माजी पदाधिकारी व युवकांना बरोबर घेउन पक्षवाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असुन पक्षाची ध्येय-धोरणे,समाजातील तळागाळापर्यंत पोहोचविणार असल्याचे सांगितले.



Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या