शिरुर तालुक्यात अज्ञात दोन मृतदेह आढळले

No automatic alt text available.मांडवगण फराटा / शिरूर , ता. ७ सप्टेंबर २०१८ (प्रतिनीधी) : शिरुर तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञात इसमांचे मृतदेह (दि.६) रोजी आढळून आले.

शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाणवाडी गावच्या हद्दीत गोलेगाव रोडलगत  तुकाईफाटा येथे शेतजमीनीजवळ एका  ४५ वयाच्या अज्ञात इसमाचा नग्नावस्थेत मृतदेह आढळुन आला.या मयताच्या अंगावर किरकोळ खरचटलेले आहे.घटनेची माहिती कळताच शिरुर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेउन घटनास्थळाचा पंचनामा केला असुन सदर इसमाबाबत कोणाला माहिती असल्यास शिरुर पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे. या प्रकरणाचा तपास शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे हे करत आहे.

तर दुस-या एका घटनेत मांडवगण फराटा (ता.शिरूर) येथे अज्ञात इसमाचा मृतदेह (दि.6)रोजी मिळून आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी राजेंद्र रामराव नागवडे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी राजेंद्र नागवडे यांना गुराख्यांच्या चर्चेतुन गावातील रामअण्णा नागवडे यांच्या शेताच्या कडेला पुरुषाचे प्रेत सडलेल्या अवस्थेत दिसून आल्याचे कळले. सदर प्रेत हे पुर्णपणे सडलेल्या अवस्थेत असल्याने नदीच्या पुरात वाहून येऊन नदीचे पाणी कमी झालेने नदीच्या कडेला थांबले असून सदर परिसर रहदारीचा व माणसाचा वावर नसल्याने त्यास कोणी न पाहिल्यामुळे जागीच सडून गेले असल्याचे व प्रेताला ओळखण्या सारखे काहीच खुणा दिसत नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून या घटनेचा पुढील मांडवगण पोलिस चौकीचे जमादार आबासाहेब जगदाळे हे करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या