पांडुरंग विद्यामंदिरात शिक्षक दिन उत्साहात साजरा

Image may contain: 10 people, people smiling, people standing and outdoorविठ्ठलवाडी, ता. ७ सप्टेंबर २०१८ (प्रतिनीधी) : विठ्ठलवाडी येथील श्री पांडुरंग विद्यामंदिरमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.                                                   

विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील श्री पांडुरंग विद्यामंदिरात शिक्षक दिनानिमित्त  डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला  इयत्ता १० वी चे विद्यार्थी सुजित गवारी व प्रतिक्षा गवारी  यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका करून संपूर्ण दिवसभरातील शालेय कामकाज सांभाळले.

यावेळी मुख्याध्यापक म्हणून कोमल गवारी तर शिक्षक म्हणून साक्षी सिताराम गवारी, साक्षी संजय गवारी, प्रतीक्षा गवारी, सुरज तळेकर यांनी काम पाहिले तर सेवक म्हणून सिद्धार्थ उबाळे याने काम पाहिले. या शिक्षक विद्यार्थ्यांचे बालचमूंनी सन्मानाने स्वागत केले. कार्यक्रमाचा समारोप शिक्षकांचा सन्मान करून झाला. यावेळी मुख्याध्यापक सुरेश थोरात, ज्येष्ठ शिक्षक भाऊसाहेब वाघ, प्रभाकर चांदगुडे, अरुण शिंदे शिरूर तालुका कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष प्रविण जगताप, बाळासाहेब गायकवाड, संगीता लंघे आदी मान्यवर उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या