पुस्तकांचे वाचन आणि गुरूंचा आदर करा : कदम

Image may contain: 6 people, people smiling, people standing and outdoorभांबर्डे, ता.७ सप्टेंबर २०१८ (प्रतिनीधी) : समाजात माणूस म्हणून जगायचे असेल तर दररोज पुस्तकांचे वाचन तर केलेच पाहिजे त्याशिवाय शिक्षकांनी सांगितलेल्या चांगल्या गोष्टी आचरणात आणताना गुरूंचा आदर केला पाहिजे असे प्रतिपादन रांजणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम यांनी केले.

भांबर्डे (ता. शिरूर) येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये आज बुधवार(दि. ५ सप्टेंबर) रोजी  शिक्षक दिनाचे औचित्य साधून राज्यसभेचे खासदार डी.पी. त्रिपाठी यांच्या निधीतून मिळालेली २५ हजार रुपयांची पुस्तके मान्यवरांच्या हस्ते विद्यालयाला देण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सहायक पोलीस निरीक्षक कदम बोलत होते. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक मारूती कदम व विद्यालयातील सर्व शिक्षकांचा संस्थेच्या वतीने तसेच श्रेयस कॉम्प्युटरच्या वतीने सन्मान करण्यात आला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष चांगदेव पिंगळे, माजी जिल्हा परिषद सदस्या कविता खेडकर, श्रेयस कॉम्प्युटरच्या संचालिका संगीता भुजबळ, रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष बबनराव कुटे, बापूराव पवार, बाळासाहेब पवार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक मारुती कदम यांनी केले. सिद्धी म्हस्के व तेजस्वी नवले यांनी सूत्रसंचालन केले, वैष्णवी पवार या विद्यार्थिनीने स्वागत केले तर निलेश माळी यांनी आभार मानले .


Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या