रांजणगाव देवस्थान ट्रस्टकडून भाविकांच्या भावनांशी खेळ
रुग्णवाहिकेमधून केली जाते अन्न पदार्थांची वाहतूक

रांजणगाव गणपती, ता. 9 सप्टेंबर 2018 (तेजस फडके): रुग्णवाहिकेचा वापर कशासाठी केला जातो हे कोणालाही विचारले तर उत्तर येईल रुग्णांसाठी. परंतु, रांजणगाव देवस्थान ट्रस्ट चक्क रुग्णवाहिकेचा वापर प्रसादासाठी लागणाऱया अन्न पदार्थांची वाहतूक करण्यासाठी करत असून, भाविकांच्या भावनांशी एक प्रकारे खेळ करत आहे.
शिरूर तालुक्यात आघाडीवर असलेल्या www.shirurtaluka.com कडे रुग्णवाहिकेचे छायाचित्र उपलब्ध झाले आहेत. या छायाचित्रांमध्ये रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या रुग्णवाहिकेमधून (MH 12, FC 9751) चक्क अन्न पदार्थांची वाहतूक केल्याचे दिसत आहे. देश नव्हे तर जगभरातील भाविक महागणपतीच्या दर्शनासाठी तासन् तास रांगेत उभे राहून दर्शन घेतात. शिवाय, मनोभावे प्रसादही घेतात. परंतु, या प्रसादासाठी लागणाऱया वस्तू चक्क रुग्णवाहिकेमधून आणल्या जातात, हे कोणाला माहितही नसले. पण, समजले तर... या सर्वांचा भांडोफोड आता झाला आहे.
रांजणगाव देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संतोष रामा दुंडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 'या रुग्णवाहिकेचा वापर अन्न पदार्थांची वाहतूक करण्यासाठी अनेक दिवसांपासून होत आहे. तसा प्रस्ताव मागील ट्रस्टनी दिला आहे. आमच्याकडे तो प्रस्ताव आहे, पण... सध्या गडबड आहे. आता मी गडबडीत आहे याचा तपशील नंतर देतो .'
कारण अथवा उत्तर काहीही असो... पण, महागणपतीच्या दर्शनासाठी येणाऱया भाविकांना मंदिरामध्ये दिला जाणाऱया प्रसादाची वाहतूक चक्क रुग्णवाहिकेमधून केली जाते, हे कोणाला माहितही नसले. कारण, त्यांच्या भावनांशी रांजणगाव देवस्थान ट्रस्ट एक प्रकारे खेळ खेळत आहे. सध्या या रुग्णवाहिकेमधून जरी अन्न पदार्थांची वाहतूक केली जात असली तरी कधी काळी यामधून रुग्णांचीही वाहतूक केली असेलच ना?


दरम्यान, रांजणगाव देवस्थान ट्रस्टकडे उपलब्ध असलेली रुग्णवाहिका ही रुग्णांसाठी आहे. परंतु, तत्काळ रुग्णांसाठी कधीच ती उपलब्ध नसते, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. रुग्णवाहिकेची विविध कारणे असली तरी याचा संपूर्ण भांडोफोड केला जाणार आहे,
(क्रमशः)