मांडवगणला इंडो-आफ्रिकन कॉन्सफरन्स संपन्न

Image may contain: 9 people, people standingमांडवगण फराटा,ता.१० सप्टेंबर २०१८(प्रतिनीधी) : मांडवगण फराटा(ता.शिरुर) येथील दादापाटील फराटे फार्मसी महाविद्यालयात १४ वी  एकदिवसीय  इंडो-आफ्रिकन कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते.

या कॉन्फरन्स चे उदघाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव फराटे पाटील, असोशिएन ऑफ फार्मसी प्रोफेशनल चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.राजीव दहिया,मृणाल फराटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पुजन करून करण्यात आली.यावेळी संस्थेच्या वतीने देश-विदेशातुन आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

या परिषदेमध्ये आफ्रिकन देशातील इथिओपीया विद्यापिठातिल डॉ.दिंगबर अंबीकर यांनी फार्मसी क्षेत्रातील समस्या व संधी याबद्द्ल मार्गदर्शन केले. राजस्थान स्थित डॉ.अलका अग्रवाल यांनी कॅन्सर या भयावह आजारांवर उपाय, उपचार व औषधप्रणाली याबद्द्ल स्लाइड़ द्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तर डॉ.गुंजन जॉडोन,डॉ.मोहम्मद राजीव मोहम्मद उस्मान यांनी ही विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.असोशिएशन ऑफ फार्मसी  प्रोफेशनल यांच्या संयुक्त विद्यमानाणे १४ व्या एकदिवसीय इंडो आफ्रिकन आंतरराष्टीय परिषदेमध्ये पोस्टर प्रदर्शन व करंट चँलेँगेस इन फार्मासुटिकल ड्रग डीझाइन अँन्ड फार्माकोलोगी या विषयांवर हि परिषद घेण्यात आली होती.

बदलत्या जीवनशैलीमुले आहारपद्धती आणि दैनंदिन आयुष्य बदल्यामूळे माणसांवर कामांचा ताण वाढत चालला आहे . या स्पर्धात्मक युगात आजारांचे प्रमाणसुध्दा वाढत असून यांचा परिणाम औषधनिर्माणशास्त्रात काही बदल घडवून नवीन संशोधन करण्याची गरज ओळखून मांडवगण फराटा येथील लोकनेते श्री दादापाटील फराटे पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय व फराटे पाटील कॉलेज ऑफ फार्मसी यांच्यावतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष राजीव फराटे पाटील यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद,किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दादा पाटील फराटे,सचिन शेलार यांनी भेट दिली.यावेळी  संस्थेच्या सचिव मृणाल फराटे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील फराटे, प्राचार्य डॉ.मृणाल शिरसाट, प्राचार्य डॉ.तुकाराम सावंत, शरदचंद्र फराटे,संग्राम राजे धावडे,प्राचार्य.विवेक सातपूते, प्रा.अमोल पितळे, प्रा.प्रवीण चोळके, प्रा.अनिता नजन, प्रा.सागर खर्डे,प्रा. जयराम पवार,प्रा.राकेश वाणी, प्रा.अविनाश ढोबळे, प्रा.योगिता टेमक,प्रा.जिवन राजगुरु, प्रा.नगरे,प्रा.सोनाली  जाधव,प्रा.विकास गडढे, विक्रम ढवळे,नवनाथ निकत,सागर कुदळे, विविध राज्यांतील विध्यार्थी, अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक उपस्थित होते.या परिषदेचे सूत्रसंचालन प्रिया शेटे व वैष्णवी कदम यांनी केले तर आभार विवेक सातपूते यांनी मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या