समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान

Image may contain: 2 people, people standing and indoorतळेगाव ढमढेरे,ता.१० सप्टेंबर २०१८(प्रतिनीधी) : विद्यार्थी घडविणे एवढेच शिक्षकांचे काम नसून समाजाच्या जडणघडणीतही शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकार संघाच्या प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य हिरामण ढोरे यांनी केले.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे तळेगाव ढमढेरे शिक्षक-शिक्षकेतर सहकारी पतसंस्था सभासद प्रशिक्षण व वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ढोरे बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की मोबाईल मुळे सध्याची पिढी बिघडत चालली आहे. त्यामुळे मोबाईल हा विद्यार्थ्यांचा शत्रू आहे. मुलांना घडविण्यासाठी व त्यांच्यावर संस्कार करण्यासाठी पालकांनीही त्याग करायला शिकले पाहिजे असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. याप्रसंगी  सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा तसेच सेवानिवृत्त सभासदांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमास सहाय्यक निबंधक हर्षित तावरे, जिल्हा बँकेच्या कर्ज विभागाचे मुख्याधिकारी अंकुशराव हिंगे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कारभारी फुंदे, अध्यक्ष डॉ. दत्तात्रय वाबळे, संजय गजरुशी, दत्तात्रय बनसोडे, बाळासाहेब गायकवाड, संगीता गवारी, प्राचार्य बाळासाहेब चव्हाण, मारुती कदम, कल्याण कडेकर, बाळासाहेब वाणी, अर्चना गोरे, राजाराम पुराणे, रावसाहेब वाघमारे, शंकर उकले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दत्तात्रय वाबळे यांनी केले तर कल्याण कडेकर यांनी सूत्रसंचालन केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या