'निमोणे आयडॉल्स' व्हॉट्सअप ग्रुपकडून शिक्षकांचा सन्मान

Image may contain: 7 people, people smiling, people standingनिमोणे,ता.११ सप्टेंबर २०१८(प्रतिनीधी) : निमोणे आयडॉल्स या व्हॉट्सअप ग्रुपकडुन निमोण्यातील सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

गेल्या अनेक वर्षांपासुन सामाजिक उत्तरदायित्व जपण्याचे काम निमोणे येथील या सोशल ग्रुपकडुन केले जात आहे.दरवर्षी गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे,गोरगरिबांना आर्थिक व इतर मदत  मिळवुन देणे,विविध सामाजिक उपक्रम राबविणे आदी कामे या ग्रुप मार्फत गेल्या अनेक वर्षांपासुन सातत्याने सुरु आहे.

या वर्षी निमोणे आयडॉल्स हॉट्स अॅपगृपच्या वतीने जि.प. प्राथमिक शाळा, दुर्गे वस्ती, कुऱ्हाडवाडी, भाऊनाथवाडी, पिंपळाचीवाडी, भोसवाडी या प्रा. शाळा, सर्व अंगणवाड्या, श्री. नागेश्वर विद्यालयातील शिक्षकांचा फेटा, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देउन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाला शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांनी हजेरी लावली.संतोष काळे यांनी प्रास्ताविक तर गौतम दळवी यांनी सुत्रसंचालन केले.

या प्रसंगी सरपंच उर्मिलाताई काळे, उपसरपंच प्रविण दोरगे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष काळे, उपाध्यक्ष रविंद्र काळे, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष दिपक काळे, शरद जोशी विचार मंच जिल्हा उपाध्यक्ष रोहिदास काळे, तालुकाध्यक्ष नवनाथ गव्हाणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शाखाध्यक्ष प्रकाश दुर्गे,मच्छिंद्र बांदल, सुरेश काळे, संजय काळे, धनंजय काळे, अशोक गाजरे, संजय दिवटे, मयुर ओस्तवाल, शैलजा दुर्गे आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या