'शिरुर बंद'ला संमिश्र प्रतिसाद (Video)

शिरूर, ता. ११ सप्टेंबर २०१८(प्रतिनीधी) : शिरूर शहर व तालुक्यात पेट्रोल व डिझेल दरवाढ  गॅस दरवाढ  जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ या सर्व महागाईच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जनता दल, अखिल भारतीय मराठा महासंघ या सर्व पक्षांच्या वतीने शिरूर शहर बंदचे आव्हान करून शहरातून भव्य मोर्चा काढण्यात आला होता.
या बंदला शिरूर शहरातून संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी अनेक व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली होती.यावेळी शिरूरचे तहसीलदार रणजित भोसले यांना आंदोलन करत यांच्या वतीने निवेदन देण्यात आल.
शिरूर बाजार समिती आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून आधी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मोर्चास सुरुवात झाली.हा मोर्चा तहसिल कार्यालयावर गेल्यानंतर या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.त्यावेळी काँग्रेसचे,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे,जनता दलाचे,अखिल भारतीय मराठा महासंघाचे कार्यकर्ते ,महिला व युवक मोठ्याप्रमाणावर उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या