सादलगावमधली अंगणवाडी झाली चकाचक (Video)

Image may contain: 15 people, people smiling, people standing
सादलगाव, ता. 11 सप्टेंबर 2018 (संपत कारकूड): येथील अंगणवाडी शेजारी गावातीलच नागरिकांकडून टाकलेले कचऱयांचे ढिगारे आणि सोडलेल्या सांडपाण्यामुळे शाळेतील 22 विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले होते. या संबंधीत प्रथम वृत्त www.shirurtaluka.com ने प्रसिध्द केले होते. या बातमीला प्रतिसाद देवून रांजणगाव एमआयडीसीमधील राधाकृष्ण फुडलॅन्ड प्रा.लि. या कंपनीकडून सोमवारी (ता. 10) अंगणवाडी शेजारील कचरा काढून केलेल्या सुशोभिकरणामुळे अंगणवाडीचे रुपच पालटले.

कंपनी म्हणजे निव्वळ नफा कमविणे अथवा रोजगार निर्माण करणे हे नसून समाजाप्रती आपल्या उत्पन्नाचा काही हिस्सा समाजकारणी लावण्याचे कार्य रांजणगाव येथील राधाकृष्ण फुडलॅन्ड प्रा.लि., या कंपनीकडून प्रत्यक्ष गावातील नागरिकांना पाहण्यास मिळाले. मुलांविषयी असणारे प्रेम आणि त्यांच्या आरोग्याशी खेळणाऱया प्रश्नांवर कंपनीने दाखविलेल्या संवेदनशिलतेबददल अख्ख्या गावाने कंपनीचे तोंड भरुन कौतुक केले.

एका दिवसात कंपनीच्या व्यवस्थापकासहित आठ कामगारांनी स्वतः झोकून देवून दिवसभर एका उकिरडयांसारखी अवस्था झालेल्या अंगणवाडीचे रुपांतर एका ‘स्वच्छ’ आणि ‘सुंदर’ शाळेमध्ये करुन दाखविले. अंगणवाडीला बाहेरुन रंगरंगोटी करुन नवीन बोर्डही लावण्यात आला. गळके पत्रे, शौचालयाची झालेली दुरावस्था, तारी कंपाऊंडमुळे मुलांना होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी काटेरी झुडपांची कत्तल इत्यादी कामे पुर्ण केली. एवढेच नव्हे तर गावातील दोन्ही अंगणवाडीतील एकूण 50 मुला-मुलींना खाऊचे वाटपही कंपीनकडून करण्यात आले.

कपंनीचे प्लन्ट मॅनेजर जयशंकर तंटी, एच.आर. एक्झिकिटिव्ह अक्षय डोंगर, कर्मचारी अंकुश नवले, रमेश तिकुडवे, नाना जाधव, सुनिल स्वामी, सागर दिवटे आणि योगेश रासकर यांनी या कामात सहभाग घेतला. गावच्या सरपंच निर्मला मिठे, उपसरपंच देविदास होळकर, सदस्य- अविनाश पवार, सौ. रुक्मिणी अडसूळ, अशोक लवांडे, सौ. निर्मला केसवड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते संजय पवार, दादा केसवड, डॉ. उध्दव साळुंके, माणिक अडसूळ, अंगणवाडी सेविका शालन काशिद, अनिता गायकवाड, मदतनीस कमल शेळके, प्रमिला जाधव यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या