शिरुर उप सोसायटीच्या सचिवाची आत्महत्या

No automatic alt text available.गणेगाव दुमाला,ता.१२ सप्टेंबर २०१८(प्रतिनीधी) : गणेगाव दुमाला(ता. शिरुर) येथील रहिवासी असलेले परंतु शिरुर उप सोसायटी मध्ये सचिव पदावर काम करीत असलेल्या सचिवाने झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याने शिरुर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

चंद्रकांत सदाशिव सांगळे(वय-४५वर्षे) असे आत्महत्या केलेल्या सचिवाचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचा मुलगा सुमित चंद्रकांत सांगळे(वय-१८वर्षे)याने दौंड पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, ही घटना सोमवार (दि.१०) रोजी सकाळी साडे आठच्या सुमारास त्यांचे वडील चंद्रकांत हे शेतातील झाडाला गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत त्याला दिसले असता त्यांना त्याने खाली उतरून घेऊन प्रथम काष्टी(ता. श्रीगोंदा)येथे उपचारासाठी दाखल केले होते परंतु डॉक्टरांनी दौंड येथील लोणकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला होता. यावेळी तपासणी करून डॉक्टरांनी चंद्रकांत यांना मयत घोषित केले. सदर घटनेबाबत दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती.मयत चंद्रकांत यांच्यावर सहकारी बँक व खासगी सावकारांकडून व्याजाने घेतलेले कर्ज होते.असे फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

या घटनेने शिरुर शहर व परिसरात खळबळ उडाली असुन ठिकठिकाणी चर्चा सुरु आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या