शिक्रापूरला चाकण चौकात तरुणाचा खून

Image may contain: foodशिक्रापुर,ता.१२ सप्टेंबर २०१८(प्रतिनीधी) : शिक्रापुर(ता.शिरुर) येथे शिक्रापुर -चाकण चौकात  तरुणाचा निर्घुन खुन करण्यात आल्याची घटना घडली.

रमेश उर्फ राम अशोक गोणे (वय २५ रा .बकोरी ता हवेली )असे खून झालेल्या तरुणांचे नाव आहे .खूनाचा या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे . याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी राम यांच्या आई बेबी अशोक गोणे (वय.४१,रा.बकोरी ता.हवेली)  यांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार दिली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि.११ संप्टेंबर) रोजी रात्री  साडे अकरापर्यंत घराच्या खाली मिञांसोबत बसला होता.त्यानंतर राम जेवण केल्यावर खाली जावुन येतो म्हणून तो  घरातुन बाहेर पडला.दरम्यान पहाटे तीनचा सुमारास राम घरात नसल्याचे पाहिल्यावर राम यांची आई बेबी यांनी रामच्या  मोबाईलवर मिस कॉल केला.त्यानंतर पोलिसांनी त्यांना झाल्या प्रकाराची माहिती दिली.

राम याच्या चेह-यावर,डोक्यावर,दोन्ही हातावर अज्ञात इसमांनी धारदार शस्ञाने वार करुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले असल्याचे त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. यासंदर्भात शिक्रापुर पोलीस स्टेशन ला अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन घटनेचा पुढील तपास शिक्रापुर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या