रांजणगाव एमआयडीसी परिसरात चालतो वेश्या व्यवसाय

Image may contain: one or more people, night, shoes, tree and outdoor
कारेगाव, ता. 14 सप्टेंबर 2018 (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीत अवैध धंदे मोठया प्रमाणात चालू आहेत. ऑनलाइन लॉटरी, जुगार, दारु तसेच वेश्या व्यवसाय मोठया प्रमाणात सुरु आहेत. परंतु, एवढं सगळं चालू असताना पोलिस मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

कारेगाव येथील यश इन चौकात असणाऱ्या हॉटेल व लॉजिंग मध्ये मोठया प्रमाणात वेश्या व्यवसाय चालु आहे. पोलिस स्टेशन पासून हि जागा अगदी हाकेच्या अंतरावर आहे. येथे दिवसा-ढवळ्या खुले आम वेश्या व्यवसाय चालू असून मुख्य चौकात हि इमारत असूनही पोलिस कारवाई का करत नाहीत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारेगाव औद्योगिक वसाहतीत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या असून त्यात अनेक कामगार त्यात काम करतात. परंतु पगार झाल्यावर पगाराचे पैसे दारु, जुगार, ऑनलाइन लॉटरी व इतर ठिकाणी खर्च करतात. त्यामुळे अनेक कामगार कर्जबाजारी झाले असून अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे हे अवैध धंदे बंद करण्यात यावेत, अशी मागणी महिलांकडून होत आहे.

दरम्यान, औद्योगिक वसाहतीत अनेक हॉटेल असून येथेही दारुविक्री चालते. काही दिवसांपूर्वी कारेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व महिलांनी दारु व इतर अवैध धंदे बंद केले होते. परंतु, दोनच दिवसात हे सगळे धंदे पुन्हा चालू झाले आहेत. पोलिसांचा यावर काहीच वचक नसल्याने दिसत असून, यामागे मोठी आर्थिक तडजोड होत आहे, असे एका सामाजिक कार्यकर्त्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या