'आपला हक्काचा माणूस' निवडणुकीच्या रिंगणात (Video)

Image may contain: 2 people, people sitting and indoor
रांजणगाव गणपती, ता. 14 सप्टेंबर 2018 (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. आपला हक्काचा माणूस म्हणून रांजणगाव परीसरात परिचीत असलेले सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव पाचुंदकर यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे.

रांजणगाव गणपती गावचे सरपंचपद इतर मागास प्रवर्ग या जागेसाठी राखीव असून, नामदेवराव पाचुंदकर यांनी सरपंच पदासाठी अर्ज भरला आहे. www.shirurtaluka.com सोबत बोलताना नामदेवराव  पाचुंदकर म्हणाले, सत्ताधार्यांनी स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी गावात माळी-मराठा वाद लावून दोन जातीमध्ये तेढ निर्माण केली होती. त्यासाठी मी सर्वांना एकत्र आणून बैलगाडा शर्यती सुरु केल्या. तसेच गावातील वर्षानुवर्षाची परंपरा असलेला कुस्तीचा आखाडा सत्ताधार्यांनी बंद केला होता. मी माझ्या स्वतःच्या जागेत आखाडा बांधून परत ती परंपरा चालू केली. सत्ताधार्यांची औद्योगिक वसाहतीत स्क्रॅपचे व्यवसाय असून त्यातील काही विघटन न होणारा कचरा हे सत्ताधारी गावात आणून जाळत होते. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येत होते. त्यावर मी गावकऱ्यांना बरोबर घेऊन आंदोलन करुन गावात कचरा जाळण्यास बंदी घातली.

मला ग्रामस्थांनी सरपंच म्हणून संधी दिल्यास गावातील वीज, पाणी, रस्ते या भौतिक सुविधा मोठया प्रमाणात उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच गावात क्रीडांगण, छत्रपती शिवाजी महाराज तसेच सगळ्या महापुरुषांचे स्मारक तसेच विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय असे अनेक उपक्रम राबविणार आहे, असेही पाचुंदकर यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या