'वडीलधाऱ्यांनी केलेल्या संस्काराची शिदोरी आयुष्यभर पुरते'

Image may contain: 7 people, people smiling, people sitting and table
निमगाव म्हाळुंगी, ता. 19 सप्टेंबर 2018 (एन.बी.मुल्ला): वडीलधाऱ्यांनी आपल्यावर केलेल्या संस्काराची शिदोरी आयुष्यभर पुरत असते, असे प्रतिपादन मराठीचे अभ्यासक संतोष परदेशी यांनी केले.

निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील विद्याविकास मंदिरात आयोजित कार्यक्रमात संस्काराचे महत्त्व या विषयावर परदेशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी आई-वडिल व गुरुजनांचा आदर करा, श्यामची आई सारखी पुस्तके वाचा असे सांगतानाच जीवन सुंदर आहे ते आनंदाने जगा असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य डी.ए.पवार होते. यावेळी एच यु आटोळे, प्रा. एन. एम. शिंगाडे, प्रा. संजय देशमुख, ए. डी. चव्हाण, विष्णू मुंजाळे, रमेश वाळके, ए.के. कारखीले, दादाभाऊ पवार, बी. ए. चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजीव मांढरे यांनी केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या