शिरुर शहरात एकावर धारदार शस्ञाने हल्ला

Image may contain: foodशिरुर, ता.२० सप्टेंबर २०१८ (प्रतिनीधी) : कॉलेजमध्ये झालेल्या भांडणाच्या कारणावरुन एकावर धारदार शस्ञाने मारहाण करण्यात आल्याची घटना (दि.१९) रोजी शिरुर शहरात घडली.

याबाबत किरण तुकाराम फलके (वय.२८, रा.रामलिंग रोड मुळ रा. कारेगाव फलके मळा, शिरुर) याने शिरुर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. या घटनेत महेश सातकर हा गंभीर जखमी झाला असुन त्याच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किरण फलके, महेश सातकर, शुभम वेताळ, तुषार मांडगे हे मातोश्री हॉटेल येथे ज्युस पित असताना दुपारी साडेबाराच्या दरम्यान तुषार मांडगे याचा पाहुणा भैय्या थेउरकर याची व शुभम चौधरी, ज्ञानेश्वर अनिल कुरंदळे, राजु गोविंद कुरंदळे (सर्व रा.अण्णापुर) व इतर ६ ते ७ मुलांनी कॉलेजमध्ये झालेल्या भांडणाच्या कारणावरुन चिडुन फिर्यादी किरण फलके, महेश सातकर, शुभम वेताळ, तुषार मांडगे यांना हातातील लेदर लोखंडी बक्कल, चाकु, मोठ्या पात्याचे लोखंडी धारदार शस्ञे यांना मारहाण केली.

या मारहाणीत फिर्यादी किरण याच्या डोक्यात मारुन जखमी केले तर महेश सातकर याच्या पोटात, छातीजवळ, मानेजवळ भोसकुन गंभीर जखमी करण्यात आल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. घटनेनंतर शिरुर पोलीसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. या प्रकरणी शिरुर पोलीसांनी गुन्हयाची नोंद केली असुन एकास अटक केली आहे. पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील हे करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या