शिरुरला चोरीप्रकरणी एकास अटक

Image may contain: one or more peopleशिरुर, ता.२० सप्टेंबर २०१८ (प्रतिनीधी) : सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करुन चोरीच्या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती शिरुर पोलीसांनी दिली.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, शिरुर शहरात (दि. ९) रोजी महेंद्रा पिकअप वाहनाचे टायर स्टेफनी, फळका, बॅटरी, यांसह स्पेअर पार्ट चोरीला गेल्याबाबत फिर्याद दाखल झाली होती. या गुन्हयाबाबत अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेचा तपास शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक उमेश भगत यांनी करताना तांञिक माहिती व विविध माध्यमातुन माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. यावेळी ठिकठिकाणी सीसीटिव्हीचे फुटेज तपासले. यावेळी एका ठिकाणी संशयास्पद आरोपीने सदरची चोरी पिकअप वाहनातtन येऊन केली असल्याचे निष्पन्न झाले.

यावेळी मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हयातील पिकअप (एम.एच.१२ के.पी.११७५) हे वाहन मिळून आले. त्यावरील चालकाकडे अधिक तपास केला असता, आरोपी सतीश अशोक राक्षे(वय.२२,रा.संविदणे) याने गुन्हयाची कबुली दिली. या आरोपी कडून चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती उमेश भगत यांनी दिली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या