पाबळला खासदार आढळराव पाटलांचा गावभेट दौरा (Video)
पाबळ, ता. २० सप्टेंबर २०१८ (प्रतिनीधी) : पाबळ (ता. शिरुर) येथे शिरुर मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ व गावभेट दौरा (दि.२१) रोजी असल्याची माहिती पाबळच्या सरपंच रोहिणी सोपान जाधव व शिवसेना आंबेगाव तालुकाप्रमुख सोपान जाधव यांनी दिली.
या विषयी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले कि,पाबळ(ता.शिरुर) येथे गेल्या दहा वर्षांपासुन सरपंच पदावर काम करत असुन शिरुर लोकसभेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेनेच्या नेत्या जयश्रीताई पलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या सर्वांगिन विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले असुन मोठ्या प्रमानावर निधी मिळाल्याने विकासकामे करता आली असुन सध्याही मोठ्या प्रमाणावर निधी मिळाल्याने विकासकामे सुरु आहे.
शिवसेनेचे शिरुर आंबेगाव चे तालुकाप्रमुख सोपान जाधव यांनी सांगितले कि, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातुन गावच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला असुन विविध विकासकामांचा शुभारंभ व गावभेट दौरा आयोजित केला असुन ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.