ते 'प्लॅंचेट' प्रकरण खोडसाळपणाचे -कैलास घोडके

शिरुर, ता.२५ सप्टेंबर २०१८ (प्रतिनीधी) : मलठण(ता.शिरुर) येथे अंधश्रद्धेचा घडलेला प्रकार हा खोडसाळपणाचा असुन नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवु नये,घाबरुन जाउ नये असे आवाहन शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांनी केले.

याविषयी मिळालेली माहिती अशी कि, मलठण (ता.शिरूर) येथे(दि.२३) रोजी अज्ञात व्यक्तीने उतारा म्हणून शेतात एका  पिशवीत लिंबु,नारळ,व काही नावे लिहिलेली चिठ्ठी त्यावर लालसर रंग टाकलेला एका पिपराच्या झाडाला लटकलेली आढळुन आली.याबाबत माहिती समजताच अंधश्रद्धा निर्मुलन समिती(अंनिस) च्या पदाधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली.गावातील ओढ्या जवळ असणा-या झाडांवरती ही पिशवी आढळून आली. अनिसच्या कार्यकर्त्यांनी येथे आल्यावर हे सर्व उतारे नष्ट केले व याबाबत ग्रामस्थांमध्ये प्रबोधन केले तसेच घाबरुन जाउ नये आवाहन केले.यावेळी अंधश्रद्धा निर्मुलन समिती(अंनिस)च्या नंदिनी जाधव, पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे, सरपंच कैलास कोळपे आदी उपस्थित होते.घटनेची माहिती समजताच शिरुर पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली.

दरम्यान शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास  घोडके यांनी हा प्रकार खोडसाळपणाचा असुन नागरिकांनी झालेल्या प्रकाराने घाबरुन जाउ नये तसेच गोपनीय माहिती घेउन या प्रकरणी चौकशी करणार असल्याचे बोलताना सांगितले.या घटनेबाबत उशिरापर्यंत कोणीही लेखी तक्रार शिरुर पोलीस स्टेशनला दिलेली नव्हती.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या