विठ्ठलवाडीतील युवकांनी जमा केले १६०० किलो निर्माल्य

Image may contain: 17 people, people smiling, people standing and foodविठ्ठलवाडी, ता. २५ सप्टेंबर २०१८ (प्रतिनीधी) : विठ्ठलवाडीतील युवकांनी विसर्जित करण्यात आलेल्या या सर्व गणपतींचे यावेळी सोळाशे किलो निर्माल्य संकलन करण्यात आले.
        
येथे  मेन चौक प्रतिष्ठानच्या युवकांनी व श्री पांडुरंग विद्यामंदिरातील  विद्यार्थ्यांनी आज भीमा नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत गणेशोत्सव विसर्जन प्रसंगी शिक्रापूर तळेगाव ढमढेरे व विठ्ठलवाडी पंचक्रोशीतील  वाड्या-वस्त्यांवरील लहान-मोठे गणेशोत्सव मंडळे व घरगुती गणपती असे एकूण सुमारे ९००  गणपतींचे भीमा नदीमधील  पाण्यात विसर्जन करण्यात आले. शिरूर तालुका कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष प्रवीण जगताप व प्रा. संदीप गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जित करण्यात आलेल्या या सर्व गणपतींचे यावेळी सोळाशे किलो निर्माल्य संकलन करण्यात आले.

निर्माल्य संकलनाचा उपक्रम  पाच वर्षापासून विठ्ठलवाडी येथील भीमा नदी काठावर राबवला जात आहे. यावेळी विविध गणेश मंडळे व गणेश भक्तांनी उत्स्फूर्तपणे आपले निर्माल्य  कार्यकर्त्यांच्या कडे  दिले. जमा झालेल्या निर्माल्यापासून  ग्रामपंचायतीच्या संत निळोबाराय उद्यानामध्ये कंपोस्ट खत तयार केले जाणार असून हे खत उद्यानातील झाडांना वापरण्यात येणार आहे .यावेळी मंडळाच्या अध्यक्ष दिनेश राऊत उपसरपंच बाबाजी गवारी,माजी उपसरपंच दिलीप गवारे ,ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर राऊत, पोलीस पाटील शरद लोखंडे, दिलीप शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.     

विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथे मेन चौक प्रतिष्ठान व श्री पांडुरंग विद्यामंदिर विठ्ठलवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या चार वर्षापासून भीमा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी  गणेश विसर्जन प्रसंगी निर्माल्य संकलन हा उपक्रम राबविला जात आहे. यासाठी मंडळाचे घनश्याम गवारी, ॲड. संतोष गवारी ,शामराव गवारी, महादेव पवार, सुधीर कातोरे आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या