मतदान प्रक्रिया शांततेत; कडक पोलीस बंदोबस्त (Live)

Image may contain: 2 people, people smiling, people standing, tree and outdoorकरडे,ता.२६ सप्टेंबर २०१८(प्रतिनीधी) : शिरुर तालुक्यात होत  असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया शांततेत सुरु आहे. करडे गावासह  इतर मतदान केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Image may contain: 5 people, including चेतन प्रतापराव चव्हाण, people smiling, people standing and outdoor
शिरुर तालुक्यात सात गावांची निवडणुक प्रक्रिया पार पाडली जात असुन प्रशासन यंञणा सकाळपासुन मतदान केंद्रांवर लक्ष ठेवुन आहे.शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती,ढोकसांगवी,करडे, आंबळे, चव्हानवाडी,कळवंतवाडी या गावांसाठी मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी मतदारांसाठी सकाळी सात वाजलेपासुन रांगा लावलेल्या आहेत.धानोरे ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे.
Image may contain: 8 people, including Girish Khandale, people smiling, people standing, tree, shoes and outdoor
यातील बहुतांश गावे अतिसंवेदनशील म्हणुन ओळखली जातात.यासाठी प्रशासनाने कसोशीने प्रयत्न केले असुन अनुचित प्रकार घडु नये या साठी बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.शिरुर चे तहसिलदार रणजित भोसले यांनी आंबळे येथे मतदान केंद्रांची पाहणी केली असुन सर्व मतदान केंद्रावर भेट देउन अधिका-यांना योग्य त्या सुचना केल्या तर करडे गावात शिरुर पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे यांसह सहका-यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.याचबरोबर कोणत्याही मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडु नये म्हणुन शिरुर,शिक्रापुर, रांजणगाव पोलीसांसह  अतिरिक्त पोलीस फौजफाटा सर्व मतदान केंद्रावर तैनात केलेला पहायला मिळाला.

सकाळी साडेअकरा पर्यंत सुमारे तीस ते चाळीस टक्के मतदान झालेले पहायला मिळाले.  

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या