शिरुर तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीत ८९.१२ टक्के मतदान

No automatic alt text available.शिरुर, ता. २७ सप्टेंबर २०१८ (प्रतिनीधी) : संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागुन असलेल्या सहा ग्रामपंचायतींसाठी ८९.१२ टक्के मतदान झाले. आज (दि.२७) रोजी मतमोजणी होणार आहे.

या निवडणुकित करडे या गावात २८०७ पैकी २४५९ असे ८७.६० टक्के मतदान झाले.तर आंबळे ग्रामपंचायत निवडणुकिसाठी २०६० पैकी १९०२ असे ९२.३३ एवढे मतदान झाले.चव्हाणवाडी ग्रामपंचायतीसाठी १३२१ पैकी ११९९ असे ९०.७६ टक्के मतदान झाले.तर कळवंतवाडी ग्रामपंचायतसाठी १०९५ पैकी ९७८ असे ८९.३१ टक्के एवढे मतदान झाले.ढोकसांगवी येथे  ९१.७१ टक्के,रांजणगाव गणपतीत ८७.५७ टक्के एवढे मतदान झाले.

दरम्यान शिरुर तालुक्यातील महत्वाच्या या ग्रामपंचायती असल्याने संपुर्ण तालुक्याचे या निवडणुकिकडे लक्ष लागले असुन या चारही ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी भाजप अशी सरळ लढत होत  असुन आंबळे येथील ग्रामपंचायत निवडणुकित आमदार बाबुराव पाचर्णे यांचे स्विय सहायक महेश बेंद्रे हे थेट सरपंचपदाचे उमेदवार होते.त्यामुळे या ग्रामपंचायतीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.सकाळी सात वाजलेपासुन प्रत्येक  ग्रामपंचायतीच्या मतदानासाठी मतदारांनी गर्दी केली होती.तर दुपारी हे प्रमाण काहीशे कमी झाले होते.दुपारी चार नंतर मतदारांनी मतदान करण्यासाठी जोर धरला होता.सायंकाळी साडेपाचपर्यंत सरासरी ९० टक्के  मतदान सर्वञ पार पडले.प्रत्येक गावात मतदान केंद्राबाहेर उमेदवार व समर्थक हे जास्तीत जास्त मतदान करुन घेण्यासाठी उभे असल्याचे घोळक्यांनी दिसुन येत होते.विशेष म्हणजे कोठेही अनुचित प्रकार न घडता खेळी मेळीच्या वातावरणात ग्रामपंचायतीचे मतदान प्रक्रिया पार पडली.या निवडणुकिकामी शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत एक उपविभागीय पोलीस अधिकारी, तीन पोलीस निरीक्षक,सात सहायक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक,७५ पोलीस  पु्रुष व महिला कर्मचारी, एक स्ट्राईकिंग फोर्स, एक दंगल नियंञण पथक, व होमगार्ड असा तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आज (गुरुवार) सकाळी १० वाजता शिरुर तहसिल कार्यालयातील सभागृहात मतमोजणी होणार आहे.दिवसभर कोठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शिरुर चे तहसिलदार रणजित भोसले व सहकारी तसेच शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांनी जातीने लक्ष ठेवले होते. त्यामुळे संवेदनशील असलेल्या ग्रामपंचायतीत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या