शिरुर तालुक्यात ग्रामपंचायतींचा निकाल धक्कादायक (Live)

Image may contain: 3 people, people standing, crowd and outdoorशिरुर, ता.२७ सप्टेंबर २०१८ (प्रतिनीधी) : शिरुर तालुक्यातील झालेल्या सहा ग्रामपंचायत निवडणुकित ऐतिहासिक निकाल लागले.काही ठिकाणी दिग्गजांना धक्का बसला तर काही मतदारांनी संमिक्ष कौल दिला. शिरुर तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींसाठी निवडणुक प्रक्रिया पार पडली.या मध्ये रांजणगाव गणपती, करडे, आंबळे, चव्हाणवाडी, ढोकसांगवी, कळवंतवाडी या तालुक्यतील मातब्बर नेत्यांच्या ग्रामपंचायती असल्याने संपुर्ण तालुक्याचे या ग्रामपंचायतींच्या निवडणुकिकडे लक्ष लागले होते.

या सर्व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी शिरुर तहसिल कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. या निवडणुकित रांजणगाव गणपती येथे  सत्तारुढ पॅनेलचा धक्कादायक पराभव झाला. जिल्हा परिषदेच्या सदस्या स्वाती पाचुंदकर यांचे पती दत्ताञय पाचुंदकर यांचा सरपंचपदाच्या निवडणूकीत सर्जेराव खेडकर यांनी पराभव केला.तर आंबळे येथे आमदार बाबुराव पाचर्णे यांचे स्वीय सहायक महेश बेंद्रे यांचा पराभव झाला.आंबळे ग्रामपंचायत मध्ये सोमनाथ बेंद्रे निवडून आले.

रांजणगाव गणपती येथे सरपंचपदासाठी दत्ताञय पाचुंदकर व सर्जेराव खेडकर यांच्यात थेट लढत झाली. यात सर्जेराव खेडकर हे विजयी झाले ढोकसांगवी येथे सरपंचपदासाठी शोभा शेलार यांचा विजय झाला.कर्डे ग्रामपंचायत येथे सरपंचपदासाठी सुनिल इसवे विजयी झाले.चव्हाणवाडी येथे संतोष लंघे सरपंचपदासाठी उभे होते त्यांनी संदिप लंघे यांचा पराभव केला. आंबळे येथे सरपंचपदासाठी महेश बेंद्रे व सोमनाथ बेंद्रे यांचात लढत झाली यात महेश बेंद्रे पराभूत झाले. महेश बेंद्रे हे आमदार बाबुराव पाचर्णे स्वीय सहायक होते. कळवंतवाडी येथे सरपंच पदासाठी दादासाहेब चव्हाण निवडून आले. करडे ग्रामपंचायत मध्ये एका वॉर्डात सुमारे २०१ मतदारांनी नोटा या शिक्कयाचा सर्वाधिक वापर केला.

विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे :-

रांजणगाव गणपती
सर्जेराव बबन खेडकर(सरपंच),आनंदा तुकाराम खेडकर,हिराबाई पंढरीनाथ खेडकर,विलास बाळासो अडसुळ,अजय तुकाराम गलांडे,निलम श्रीकांत पाचुंदकर,धनंजय विठ्ठल पवार,सुजाता पंडित लांडे,सुरेखा प्रकाश लांडे,बाबासो धोंडिबा लांडे,स्वाती भानुदास शेळके,सुप्रिया योगेश लांडे,राहुल अनिल पवार,रंभा मानिक फंड,अनिता सुदाम कुटे,संपत गणपत खेडकर,आकाश संजय बत्ते,अर्चना संदिप पाचुंदकर

करडे
सुनिल चंद्रकांत इसवे(सरपंच), गणेश कैलास वाघमारे,घायतडक भाग्यश्री गणेश, कैलास बाबुराव वाळके,सुनिता संतोष रोडे,वाळके  रोहिणी बबन,सागर रामचंद्र इसवे,किशोरी संतोष घायतडक,कार्तिका संजय जगदाळे,गणेश दत्ताञय रोडे,रुपाली विजयकुमार जगदाळे,अंकुश सुदाम बांदल

आंबळे
सोमनाथ शिवाजी बेंद्रे(सरपंच),राजेंद्र गौतम झेंडे,सुनिता अर्जुन जाधव,जयश्री दिपक बेंद्रे,शरद अशोक निंबाळकर, रंजना अनिल बेंद्रे,प्रज्ञा श्रीकृष्ण सिन्नरकर,प्रदिप मधुकर ठोंबरे,अनिल सुदाम नरवडे,पुनम राजेंद्र बेंद्रे

चव्हाणवाडी
संतोष भरत लंघे(सरपंच),अक्षय श्रीपती बांदल,महेंद्र बाळासाहेब जासुद,जयश्री लोखंडे,शोभा राजेंद्र मोहिते, प्रभावती राजेंद्र गरुड,वैभव रावसाहेब जगदाळे,स्वाती सुरेश हराळे

ढोकसांगवी
शोभा दशरथ शेलार(सरपंच), सुहास पंढरीनाथ मलगुंडे, संगिता कैलास अभंग, उषा सुनिल अभंग, मल्हारी फक्कड मलगुंडे, निलेश मनोहर लगड, राणी दादाभाउ मलगुंडे, प्रविण किसन साळवे, मनिषा सतीश पाचंगे, जिजाबाई किसन पाचंगे

कळवंतवाडी
दादासो माधव चव्हाण (सरपंच), उत्तम बबन चव्हाण, सारिका अजय चव्हाण, स्वाती बबन म्हाळसकर, स्वाती अनिल अनोसे, देविदास चांगदेव होलगुंडे, संदिप बाळासाहेब संकपाळ, स्वाती विजय वाळके

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या