महावितरणची नवीन वीजजोडणी ऑनलाईनद्वारेच

मुंबई, ता. २९ सप्टेंबर २०१८ (प्रतिनीधी) :  राज्याच्या शहरी भागात नवीन वीजजोडणी व ग्राहकांच्या नावातील बदलाचे अर्ज दि. १ नोव्हेंबर २०१८ पासून केवळ ऑनलाईनद्वारेच स्वीकारण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. याबाबतचे आदेश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी दिले असून तसे परिपत्रकही जारी करण्यात आले आहे.

नवीन वीजजोडणी व नावातील बदल करणे यात पारदर्शकता आणण्यासाठी तसेच जोडणीच्या संपूर्ण प्रक्रियेची सद्यस्थिती ग्राहकांना कळावी यासाठी महावितरणने ही प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. महावितरणच्या शहरी भागातील कोणत्याही कार्यालयात नवीन वीजजोडणी व नावातील बदल करण्याचे अर्ज ऑफलाईन स्वीकारले जाणार नाही.

महावितरणचे मोबाईल ॲप व संकेतस्थळ www.mahadiscom.in याद्वारे ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. या सेवेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या