पेपरविक्रेता झाला गावचा सरपंच... (Video)

करडे, ता. ३० सप्टेंबर २०१८ (सतीश केदारी) : शिरुर तालुक्यातील करडे गावात सर्वसामान्य कुटुंबातील सुनिल इसवे यांना  मतदारांनी  बहुमताने निवडून दिले असून यापुर्वीचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.
शिरुर तालुक्यातील सात ग्रामपंचायतींचा निवडणुक कार्यक्रम नुकताच शांततेत पार पडला. या मध्ये अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. करडे ग्रामपंचायत मध्ये अटितटीची लढाई पहायला मिळाली. या निवडणुकित सरपंचपदावर सुनिल  इसवे हे विराजमान झाले आहे. त्यांच्याशी www.shirurtaluka.com शी संपर्क साधला असता त्यांनी जीवनसंघर्ष उलगडून दाखविला. या वेळी बोलताना ते  म्हणाले कि, पुर्वी मी पेपर विकायचे काम करायचो. त्या नंतर एका  हॉस्पिटल मध्ये कंपांउडर म्हणूनही काम केले. परिस्थितीशी झगडत असताना रांजणगाव औद्योगिक वसाहतीत सुरक्षारक्षाकाचीही काही काळ नोकरी केली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सरपंचपदाची संधी मिळाल्याबद्दल सर्व ग्रामस्थ व मतदारांचे त्यांनी आभार मानले.

सर्वसामान्य जनतेचा विजयः कैलास वाळके

करडे गावात जनतेने दिलेला कौल हा सर्वसामान्य जनतेचा विजय असल्याचे करडे ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सदस्य कैलास वाळके यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या