एमआयडीसीत मारहाण करुन लुटणारी टोळी अटकेत

Image may contain: one or more peopleरांजणगाव गणपती, ता.१ अॉक्टोबर २०१८(प्रतिनीधी) : चालकांना मारहाण करुन लुटनारी टोळी रांजणगाव पोलीसांनी अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव एमआयडीसीतील जोतून कंपनीजवळील मोकळ्या मैदानात ट्रेलरचा ड्रायव्हर सलीम सरजीत खान (रा.हरियाणा) याला शिविगाळ करुन आरोपींनी लाथाबुक्कयांनी मारहाण करुन जबरदस्तीने खिशातील पैसे काढले व अधिकचे पैसे मागितले होते. या  घटनेचे तपास करताना रांजणगाव पोलीसांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम, विनोद  मोहिते, चंद्रकांत काळे, अजित भुजबळ, प्रफुल्ल भगत, गणेश सुतार, उमेश कुतवळ यांनी सापळा रचून सचिन अशोक शिंदे (रा. ढोकसांगवी), सचिन गोपलराव मनोहर (रा. ढोकसांगवी), चंद्रकांत थडके (रा. कारेगाव) यास ताब्यात घेउन अटक केली.

रांजणगाव पोलीसांनी एमआयडीसी परिसरात शांतता व कायदा सुव्यस्था कायम राहण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतले असून त्यांच्या या कामगिरिबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या