शिरसगावात चक्रीवादळाने केला मोठा हाहाकार...

Image may contain: sky, grass, outdoor and natureशिरसगाव काटा, ता.२ अॉक्टोबर२०१८ (प्रतिनीधी) : शिरसगाव काटा(ता.शिरुर) येथे (दि.१) रोजी झालेल्या वादळाने गावातील जि.प शाळेचे तीन वर्गखोल्यांचे पञे उडुन गेले तर सुमारे १५० विजेचे खांब उन्मळुन पडले असुन एका मुलीला दुखापत झाली आहे.

Image may contain: indoorसविस्तर असे कि, सोमवार (दि.१) रोजी दुपारी तीनच्या नंतर अचानक वादळाला सुरुवात झाली.यावेळी वादळात पावसानेही चांगलाच जोर धरला होता. साडेचारच्या  सुमारास वादळाचा तडाखा बसल्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तीन वर्गखोल्यांचे पञे उडुन गेले. गावानजीक न्हावरे-इनामगाव रस्त्यालगत असलेल्या विद्युत रोहिञ पुर्णपणे जागीच उखडुन पडुन गेले. या झालेल्या वादळात विद्युत वाहक तारा मोठ्या प्रमाणावर तुटल्या तर सुमारे १००-१५० विद्युत खांब पडले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. शिरसगाव मध्ये घिसाडी काम करुन उदरनिर्वाह करणा-या कुटुंबातील मुलीला या वादळात घराचे पञे उडुन लागल्याने दुखापत झाली आहे. तसेच या वादळात गावातील घरांची पडझड झाली असुन फळबागा, पिकांचेही नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे.गावातील  मंदिराच्या छताच्या संरक्षक बाजुची पडझड झाली असुन सर्वञ वादळाचा हाहाकार दिसुन येतो.

ग्रामस्थांनी वादळात झालेल्या नुकसानीचे शासनाने तातडीने पंचनामा करावेत अशी मागणी केली आहे. दरम्यान शिरसगाव काटाचे सरपंच सतीश चव्हान,घोडगंगेचे संचालक नरेंद्र माने यांनी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन सभापती सुजाता पवार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांची भेट घेउन शाळेच्या झालेल्या नुकसानीबाबत सांगताच जिल्हा परिषदेने तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले असल्याचे नरेंद्र माने यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या