साहिल शिंदे याची कुस्ती मध्ये विभागासाठी निवड

Image may contain: 1 person, standing and shortsशिरूर, ता.२ अॉक्टोबर२०१८ (प्रतिनीधी) : शालेय कुस्ती स्पर्धेत विद्याधाम प्रशाला शिरुर या विद्यालयातील साहिल मारुती शिंदे या विद्यार्थ्याची विभागीय पातळीवर कुस्तीसाठी जिल्हयातुन विभागासाठी निवड झाली.

इंदापूर मधील मारकड कुस्ती केंद्रात जिल्हा पातळीवर शालेय कुस्ती स्पर्धा पार पडल्या. विद्याधाम प्रशाला शिरुर मधील इयत्ता ८ वीत शिकणारा साहिल मारूती शिंदे या विद्यार्थ्यांने १४वर्षाखालील ६८किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळविला. शिरुर शहरातील मोठी तालीम येथे वस्ताद गेनभाऊ येलभर आणि अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती चे धड़े गिरवत आहे. त्याच्या उत्तुंग यशाबद्दल व्हील्स इंडिया कंपनी तील कर्मचारी आणि अधिकारी वर्ग विद्याधाम प्रशालेचे मुख्याध्यापक खरमाटे, शिरुर तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव संदीप सरोदे  यांनी अभिनंदन केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या