शिरुर पंचायत समितीच्या उपसभापती जयमाला जकाते

Image may contain: one or more people and people standingशिरुर, ता. ४ अॉक्टोबर २०१८ (प्रतिनीधी) : शिरुर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी जयमाला शिरीष जकाते यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती प्रांत अधिकारी भाउसाहेब गलंडे यांनी दिली.

पंचायत समितीच्या उपसभापती मोनिका हरगुडे यांनी राजीनामा दिल्याने उपसभापतीपद हे रिक्त झाले होते. बुधवार (दि.३) रोजी उपसभापतीपदाच्या निवडीपुर्वी पक्षाची बैठक पार पडली. या वेळी जिल्हाध्यक्ष प्रदिप गारठकर, माजी आमदार अशोक पवार, माजी आमदार पोपटराव गावडे, शिरुर-आंबेगाव तालुकाप्रमुख मानसिंग पाचुंदकर, शिरुर तालुकाध्यक्ष रविंद्र काळे आदींच्या झालेल्या बैठकित पक्षाच्या ठरलेल्या ध्येय-धोरणानुसार पहिले अडीच वर्ष सभापतीपद शिरुर-आंबेगाव ला तर  उपसभापतीपद शिरुर-हवेलीला देन्याचे ठरले होते.

त्यानुसार शिक्रापुर गणातील राष्ट्रवादीच्या  जयमाला शिरीष जकाते यांची एकमताने नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज प्रांताधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी भाउसाहेब गलंडे यांच्याकडे दाखल केला. तर विरोधी पक्षाच्यावतीने विजय रणसिंग यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज माघार घेण्याच्या मुदतीत विजय रणसिंग यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने जयमाला शिरिष जकाते या बिनविरोध निवडुन आल्याचे जाहिर केले.

निवडीनंतर राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रदिप गारठकर यांनी जकाते यांचा सत्कार केला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या