पोखरकर परिवाराचा मेळावा आंबेगावला संपन्न

Image may contain: one or more people, people standing and weddingपिंपरखेड, ता. ४ अॉक्टोबर २०१८ (प्रतिनीधी) : पोखरकर परिवार प्रतिष्ठाण करत असलेल्या कामांची माहिती देवाण घेवाण करणे यासाठी पोखरकर परिवार प्रतिष्ठाणने खडकी (ता. आंबेगाव) येथे आयोजित केलेला मेळावा उत्साहात संपन्न झाला.

होळकरांचा वारसा असलेल्या ऐतिहासिक गाव खडकी पिंपळगाव येथे पोखरकर परिवार मेळाव्याला मुंबई, ठाणे, संगमनेर, जालना, अहमदनगर, औरंगाबाद, सोलापूर, नाशिक व पुणे जिल्ह्यातील पोखरकर बांधव उपस्थित होते.

यावेळी शिष्यवृत्तीत यश प्राप्त केलेल्या मुलांचा सन्मान तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक संतोष पोखरकर ,माजी सैनिक विकास पोखरकर,शरद पोखरकर जितेंद्र पोखरकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वैद्यकीय जागरूकता कार्यक्रम,विविध शैक्षणिक उपक्रम, किमान कौशल्य व कौशल्य विकास उपक्रम, कल्याण व विकासात्मक कार्यक्रम या ध्येय व उद्दिष्ट्यावर तसेच स्मरणिका, यशोगाथा, कालदर्शिका,डिरेक्टरी, व पतसंस्थेच्या सभासद नोंदणी व उद्घाटन यावर चर्चा करण्यात आली.

महाराष्ट्रतील दिडशे गावात पोखरकर परिवारातील बांधव विखुरलेले आहेत.परिवारातील मागासलेल्या बांधवांना आपल्या बरोबरीने घेऊन त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी १९९७ ला पोखरकर परिवार प्रतिष्ठान ची स्थापना केली. त्यावेळी  वेळी विविध जिल्ह्यात अडीच हजार कुटुंबांचा सर्वे करण्यात आला.अशी माहिती पोखरकर परिवार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष उद्योजक वसंतराव उर्फ नानासाहेब पोखरकर यांनी मार्गदर्शन करताना दिली. खेड पंचायत समितीचे उपसभापती भगवान पोखरकर, जेष्ठ पत्रकार विजयराव पोखरकर, शिवसेना संपर्क प्रमुख भरत पोखरकर,सत्यवान पोखरकर, रोटरी क्लब मंचरचे माजी अध्यक्ष शरद पोखरकर, समाजसेवक दादाभाऊ पोखरकर, नामदेव पोखरकर, विलास पोखरकर, पोपट पोखरकर, शिवाजी पोखरकर यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी माजी न्यायाधीश नामदेव पोखरकर, महानगरपालिका माजी उपायुक्त भरत पोखरकर, अ.नगर जिल्हा सहकारी बँकेचे माजी सरव्यवस्थापक भानुदास पोखरकर, राहूरी कृषी विद्यापीठ प्राध्यापक डॉ. वसंत पोखरकर, पोखरकर परिवाराच्या विश्वस्त मीरा पोखरकर, माजी जि.प.सदस्य मथाजी पोखरकर, अॅड.बाळासाहेब पोखरकर, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक विनोद पोखरकर आदी मान्यवर व मोठ्या संख्येने पोखरकर बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैभव पोखरकर व आभार जितेंद्र पोखरकर यांनी मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या