मतदारांचा विश्वास सार्थ ठरविणार: चव्हाण (Video)

कळवंतवाडी, ता.४ अॉक्टोबर २०१८(प्रतिनीधी) : मतदारांना दाखविलेला विश्वास सार्थ ठरविणार असुन सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे कळवंतवाडीचे नवनिर्वाचित उमेदवार दादासाहेब चव्हाण यांनी सांगितले.
शिरुर तालुक्यात  सहा ग्रामपंचायतींचा निवडणुक कार्यक्रम नुकताच पार पडला.संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकित कळवंतवाडी ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी दादासाहेब चव्हाण हे उमेदवार होते.मतदारांनी मोठ्या फरकाने दादासाहेब चव्हाण यांना निवडुन दिले.

निवडीनंतर सरपंच दादासाहेब चव्हाण यांनी सर्व मतदारांचे आभार मानले असुन तळागाळात शासकिय योजना पोहोचविण्याबरोबरच सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. दादासाहेब चव्हाण हे राष्ट्रवादीचे शिरुर शहराध्यक्ष अमोल चव्हाण यांचे वडील आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या