वाळू उपसा करणाऱ्या बोंटींवर धडक कारवाई (Video)

Image may contain: outdoorनिमोणे, ता. 5 अॉक्टोबर 2018 (प्रतिनीधी) :  निमोणे लगत पिंपळाचीवाडी (ता.शिरूर) येथील घोडनदीपात्रातून अनधिकृतपणे वाळू उपसा करणारे वृत्त www.shirurtaluka.com ने प्रसिद्ध केल्यानंतर शिरूर महसुल विभागाने बोंटीवर धडक कारवाई करत तब्बल १३ बोटी नष्ट केल्या. हि कारवाई केली तरी वाळूतस्करांना फरक पडेल काय ? असा सवाल व्यक्त केला जात आहे.

निमोणे (ता.शिरूर)लगत पिंपळाचीवाडी परिसरातील घोडनदीपात्रामध्ये गेली काही महिन्यांपासुन अनधिकृतपणे वाळु उपसा चालु होता. या ठिकाणी शासनाच्या वतीने वाळु लिलावाचा कोणताही ठेका नसताना  वाळु माफियांनी दहशतीच्या जोरावर नदिपात्रामध्ये भरपुर पाणी असतानाही अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने नदिपात्रात अक्षरशः धुमाकुळ घातला होता. तर भल्या मोठया ट्रकांमधुन रात्रंदिवस वाळुची वाहतुक चालु होती. शासनाचा लाखो रुपयांचा महसुल बुडवून भरपूर पैसा कमावणारा हा गोरखधंदा राजरोसपणे चालु होता. नदिपात्राचे लचके तोडत असताना यांना विरोध करणारी एखादी यंत्रणा आहे की नाही? हा सामान्य माणसाला सतत प्रश्न पडत होता. साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर करत, आपले कोणीही काही 'वाकडे' करू शकत नाही, या अविर्भावात' बिनधास्त 'पणे वाळुची तस्करी करणाऱ्यांना अखेर शिरूरचे तहसिलदार रणजित भोसले यांनी गनिमी कावा करत ' मुंह तोड जबाब दिला.

हि धाडसी मोहिम  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सुट्टी असतानाही शिरूर महसुल विभागाने ही यशस्वीपणे पार पाडली. यासाठी तहसिलदार भोसले यांनी आदल्या रात्रीच कारवाईचे नियोजन केले होते. सुट्टी असल्याने अधिकाऱ्यांवर असणारी पाळतही राहणार नाही याची खात्री होती. शिवाय याबाबत कमालीची गुप्तता ही पाळण्यात आली होती. शिवाय शिरूर पोलीस स्टेशनमधुन तीन हत्यारबंद कर्मचारी सोबत घेतले होते.शिरूरमधुन एक बोट भाडोत्री घेऊन वाहनात भरून, मंगळवारी भल्या पहाटे 'कृष्णामाई डोह' परिसरातुन बोट नदिपात्रात सोडुन त्यात बसुन सर्व स्टाफ जलमार्गेच पिंपळाचीवाडी परिसरात आला.

या दरम्यान तीन फेऱ्या झाल्या व यावेळी अवैध वाळु उपसा करणाऱ्या तब्बल १३ बोटी आढळुन आल्या. त्या जाळुन नष्ट करण्यात आल्या. यामुळे माफियांचे ५०ते ६० लाखांचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे वाळुमाफीयांचे कंबरडे मोडले असुन , घोडनदिपात्रातील आतापर्यंतची ही सर्वांत मोठी कारवाई मानली जाते. या कारवाईचे सामान्य नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी मोठे स्वागत केले असुन या भागात फोफावत असलेली ही 'विषवल्ली' कायमची समुळ नष्ट करावी अशी नागरिकांची मागणी आहेच.तहसिलदारांनी धाडसी मोहिम राबविली तरी वाळुतस्करांना याचा फरक पडेल काय असा सवाल नागरिकांकडून केला जातो.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या