'घोडगंगा'चा बॉयलर अग्नीप्रदीपण व गव्हाण पूजन (Video)

न्हावर, ता. 4 ऑक्टोबर 2018 (तेजस फडके): न्हावरे (ता.शिरुर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा 22 वा बॉयलर अग्नीप्रदीपण व गव्हाण पूजन शुभारंभ तालुक्यातील कीर्तनकार व प्रवचनकार महाराज यांच्या हस्ते पार पडला.

घोडगंगा सहकारी साखर कारख्यान्याचा शुभारंभ www.shirurtaluka.comने Live केला होता. नेटिझन्सचा त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी सुमारे 200 हून अधिक कीर्तनकार व प्रवचनकार महाराज उपस्थित होते. यावेळी समस्त महाराजांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरुपात कीर्तन केसरी ह.भ.प. पुंडलिक महाराज नागवडे, संतराज महाराज देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.सुरेश  साठे, ह.भ.प.रामदास साठे, ह.भ.प. नवनाथ माशेरे,ह.भ.प. अभिजीत जाचक, यांनी कारखान्याच्या गाळप हंगामाला शुभेच्छा दिल्या ह.भ.प.सायली सातकर, ह.भ.प.अविनाश साळुंके, ह.भ.प.आनंदा महाराज टाकळीकर, ह.भ.प.बापु निगडे, ह.भ.प.नवनाथ भोसले, ह.भ.प. शिवाजी मचाले, ह.भ.प. रामदास फडके, ह.भ.प. राजेंद्र गरुड, ह.भ.प. बाळासाहेब भोसले इत्यादी कीर्तनकार महाराज व प्रवचनकार महाराज उपस्थित होते.
 
कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार अॅड.अशोक पवार म्हणाले की, 'कारखाना कार्यक्षेत्रात आडसाली उसाचे प्रमाण 20 टक्क्यापेक्षा कमी करणे हे कारखान्यासमोर आव्हान आहे. एफ.आर.पी. ही रिकव्हरी वर अवलंबून असते. त्यामुळे आडसाली उसाचे प्रमाण कमी करणे हे सर्वच सभासदांच्या हिताचे आहे. तसेच सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या करारावर शासनाने अनुदान द्यावे. प्रायोगिक तत्त्वावर घोडगंगा कारखान्याच्या वतीने न्हावरे गाव सुमारे 70 टक्क्यांपर्यंत ठिबक सिंचनाखाली आणले जाणार आहे.'

यावेळी शिरुर पंचायत समितीचे सभापती विश्वास कोहकडे, जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या अध्यक्षा सुजाता पवार, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे, घोडगंगाचे उपाध्यक्ष संतोष रणदिवे, शिरुर बाजार समितीचे उपसभापती विश्वास ढमढेरे, कारखान्याचे कार्यकारी संचालक संभाजी पाटील कारखान्याचे संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारखान्याचे संचालक बाबासाहेब फराटे यांनी स्वागत केले. प्रास्ताविक कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रा. सुभाष कळसकर यांनी केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या