साधूचे कपडे परिधान करून राहणाऱया दरोडेखोराला बेड्या

Image may contain: 7 people, people smiling, people standing and shoes
शिरूर, ता. 5 ऑक्टोबर 2018: साधूचे कपडे घालून व दाढू वाढून राहणाऱया कुख्यात दरोडेखोराला पकडून बेड्या ठोकण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मोठे यश आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांभुर्डे (ता. पारनेर, जि. अहमदनगर) या ठिकाणी विविध गंभीर गुन्ह्यात फरार असलेला कुख्यात दरोडेखोर रविंद्र उर्फ रव्या अशोक काळे हा साधूचे कपडे घालून व दाढी वाढवून राहत असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी जाऊन गुरुवारी (ता. 4) मध्यरात्री छापा टाकला असता काळेला मोठ्या शिताफीने पकडण्यात यथ आले आहे. काळे हा गंभीर गुन्ह्यांमध्ये फरारी होता. शिरूर, शिक्रापूर, दौंड पोलिस स्टेशनमध्ये त्याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. काळे याला पुढील चौकशीसाठी शिरूर पोलिसाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलिस निरिक्षक दयानंद गावडे, पोलिस उपनिरीक्षक महेश मुडे, पोलिस कर्मचारी दत्तात्रेय गिरमकर, शंकर जम, श्री. जावळे, शरद बांबळे, पोपट गायकवाड, राजू मोमीण, श्री. साबळे, पोलिस मित्र योगेश नवले यांनी कारवाई केली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या