फियाटमधील शिकाऊ कामगारांना कायम करण्याचा निकाल

Image may contain: sky and outdoor
रांजणगाव गणपती, ता. 7 ऑक्टोबर 2018: रांजणगाव एमआयडीसीमधील फियाट कंपनीच्या शिकाऊ कामगारांना नोकरीत कायम करण्याबाबतचा निकाल औद्योगिक न्यायालयाने दिला आहे. अडीच वर्षे शिकाऊ (ट्रेनी) तत्त्वावर काम केलेल्या अनेक कामगारांना फियाट कंपनीने कामावरून काढले होते, याबाबत लोककल्याण मजदूर युनियनने दाखल केलेल्या दाव्यात न्यायाधीश एम. आर. कुंभार यांनी या कामगारांना नोकरीत पुन्हा रुजू करण्याचा आदेश दिला.

फियाट कंपनीने ट्रेनी म्हणून काम करणाऱ्या अनेक कामगारांना 2010 मध्ये नोकरीवरून काढून टाकले. यापैकी 31 कामगारांच्या वतीने लोककल्याण मजदूर युनियनचे अध्यक्ष ऍड. आर. बी. शरमाळे यांनी दावा दाखल केला होता, तर फियाट कंपनीच्या वतीने ऍड. राजीव जोशी व आदित्य जोशी यांनी युक्तिवाद केला. 31 कामगारांना कंपनीने नोकरीत पुन्हा रुजू करून घ्यावे व कामगारांना घरी बसवलेल्या काळाच्या वेतनापैकी 50 टक्के वेतन व इतर फायदे द्यावेत, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर कामगारांनी आनंद व्यक्त केला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या