प्रा.बाळासाहेब गायकवाड राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

Image may contain: 4 people, people smiling, people standingनिमोणे, ता.१० अॉक्टोबर २०१८(प्रतिनीधी) ग्लोबल अॅग्रो फाऊंडेशन व शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना यांच्या वतीने निमोणे येथील प्रा. बाळासाहेब गायकवाड यांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १६ जणांना पुरस्कार प्रदान करण्यात आल्याची माहिती शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठलराव पवार यांनी दिली.

ग्लोबल अॅग्रो फाऊंडेशन व शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना यांचे संयुक्त विद्यमाने उस, दुध परिषद व शेतकरी, कष्टकरी, कामगार, सहकार मेळावा आयोजित करण्यात आला होता.

या सोहळ्यात अरुण नरके -सहकार रत्न, प्रकाश कुतवळ- विशेष सामाजिक कार्य,ज्युबिलंट कंपनी -सार्वजनिक उपक्रम, भगवानराव वैराट - पुणे रत्न,आमदार बच्चू कडू -राष्ट्र रत्न, विजय जावंधीया -राष्ट्ररत्न योद्धा शेतकरी, किशोर बरकले-शोध पत्रकारीता, विठ्ठल काटे -समाजरत्न सा. कार्य, अबेदा पी.ए. इनामदार -सामाजिक, शैक्षणिक आरोग्य, बाळासाहेब ए, गायकवाड ( लोकमत ) -विशेष पत्रकारिता, शामराव देसाई -राष्ट्र रत्न सामाजिक कार्य, अॅड. राजेश इनामदार -सामाजिक कार्य, संगमेश ए. भैर गौंड- सामाजिक कार्य, पै. विजय चौधरी- राष्ट्ररत्न, पै. महेश मोहळ -राष्ट्र रत्न,TV9 इले. मिडियाचे रोहित वर्मा -विशेष सामाजिक कार्य यांना उल्लेखनिय कार्याबद्दल सन्मानचिन्ह व शेतक-यांचा आसुड देउन गौरविण्यात आले.

'का होत आहेत शेतकरी आत्महत्या ? '( इंग्रजी ) व 'काय आहे डॉ. स्वामीनाथन समितीचा अहवाल?' (हिंदी) या दोन विशेष स्मरणिकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले..

या प्रसंगी त्रिपुराचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ.डी.वाय. पाटील, आमदार विदयाताई चव्हाण, विठ्ठलराव पवार, माजी न्यायमूर्ती जी.डी. इनामदार, निमोणेच्या माजी सरपंच जिजाताई दुर्गे,शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष भरत काळे, जिल्हा उपाध्यक्ष रोहिदास काळे,शिरुर तालुकाध्यक्ष नवनाथ गव्हाणे,प् रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष दिपक काळे,मच्छिंद्र बांदल, मयुर ओस्तवाल, यमराज काळे यांसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा संपन्न झाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठलराव पवार यांनी केले तर सुञसंचालन वृषाली गव्हाने, प्रा. तुकाराम कुटे यांनी केले आभार नंदा जाधव यांनी मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या