रांजणगावमध्ये सीएनजी गॅस स्टेशनचा आज शुभारंभ

Image may contain: outdoor
रांजणगाव गणपती, ता. 11 अॉक्टोबर २०१८(प्रतिनीधी) : बहुप्रतिक्षित सीएनजी गॅस पंपाचा आज (दि. ११) रोजी मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ होणार असल्याची माहिती साई गणेश पेट्रोल पंपाचे संचालक तुषार काळे यांनी दिली.

शिरुर तालुक्यात नागरिकांना कमी दरात सी.एन.जी उपलब्ध व्हावा या दृष्टीने तुषार काळे यांनी रांजणगाव गणपती येथे सी.एन.जी गॅस स्टेशन उभारले आहे. यामुळे शिरुर शहर, रांजणगाव गणपती, कारेगाव यांसह नगर-पुणे रोड ने प्रवास करणा-या शेकडो नागरिकांना याचा फायदा होणार आहे. गेल्या काही दिवसांपुर्वीच याची उभारणी करण्यात आली होती व लवकरात लवकरात सुरु करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती.

या सी.एन.जी गॅस स्टेशनचे आज (गुरुवार) विविध क्षेञातील मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे, अशी  माहिती श्री. काळे यांनी दिली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या