चिंचणीमध्ये जमिनीच्या वादातून दोन गटांत हाणामारी

Image may contain: one or more people and shoesशिरूर, ता. 11 ऑक्टोबर 2018: चिंचणी (ता. शिरूर) येथे शेतजमिनीच्या वादातून भावकीतील दोन कुटुंबांत बुधवारी (ता. 10) दुपारी जोरदार हाणामारी झाली. या मारामारीत गज, लोखंडी रॉड, मिरची पावडरचा वापर करण्यात आला. दोन्ही बाजूंनी केलेल्या दगडफेकीत तीन जण जखमी झाले असून, पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

भाऊसाहेब बाबूराव धावडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सुनील धावडे, अजित धावडे, आबन धावडे, सुदाम धावडे, गोरख धावडे, संजय धावडे, रोहित धावडे व आबासाहेब धावडे यांच्याविरुद्ध; तर सुनील भीमराव धावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाऊसाहेब धावडे, गणेश धावडे, संतोष धावडे, अशोक धावडे, संदीप धावडे, राजेंद्र धावडे, संपत धावडे व स्वप्नील पठारे (सर्व रा. चिंचणी) यांच्याविरुद्ध बेकायदा जमाव जमवून मारामारी केल्याप्रकरणी व परस्परांना दुखापती केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
चिंचणी येथे घडलेल्या या प्रकारानंतर गाव व परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते.

भाऊसाहेब व सुनील हे चुलत भाऊ आहेत. त्यांच्यात शेतजमिनीवरून वाद आहेत. त्यातून भाऊसाहेब व त्यांच्या कुटुंबातील इतरांनी सोमवारी (ता. 8) रात्री सुनील यांच्या घरी जाऊन दमदाटी केली व त्यांच्या पत्नी अनिता यांना ढकलून दिले. दरम्यान, बुधवारी सकाळी भाऊसाहेब यांनी शेतात वाद मिटविण्यासाठी बोलावले व तेथे त्यांच्या दहा ते बारा साथीदारांनी सुनील व त्यांच्या कुटुंबीयांवर दगडफेक केली, गजाने मारहाण केली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या