वाघेश्वर मोटर्स शोरुमचे अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

Image may contain: 11 people, people smiling, people standingमांडवगण फराटा,ता.१२ अॉक्टोबर २०१७(प्रतिनीधी) : वाघेश्वर मोटर्स या शोरुमचे माजी उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले.

मांडवगण फराटा(ता.शिरुर) येथे वाघेश्वर मोटर्स या नव्या शोरुमच्या उद्घाटन प्रसंगी व आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.प्रारंभी वाघेश्वर मोटर्सचे संचालक व रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधीर फराटे यांनी माजी उपमुख्यमंञी अजित पवार यांचा पुष्गुच्छ देउन  सत्कार केला.


पुढे बोलताना पवार म्हणाले कि, जिल्हा बॅंकेची आर्थिक स्थिती अतिशय चांगली होती.परंतु नोटाबंदीच्या काळानंतर जिल्हा बॅंकेचे पैसे अडवल्याने सभासदांचे मोठे नुकसान झाले.या सरकारच्या चुकिच्या धोरणांचा फटका थेट सर्वसामान्यांना बसत आहे.पेट्रोल च्या किंमती नव्वदच्या पुढे गेल्या तर गॅसच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असुन हे सरकार केवळ जाहिरातबाजीत पटाईत आहे.या सरकारला शेतीच्या पाण्याचे नियोजन करता येत नाही.तसेच विजेचे भारनियमन सनासुदीच्या काळात सुरु केले असुन सण अंधारात साजरे करायचा का असा सवालही त्यांनी केला.गांधी जयंती दिवशी सरकारने शेतक-यांवर अश्रुधुर,पाण्याचे फवारे मारले इतके असंवेदनशील हे सरकार असुन संसारी माणसानेच सरकार चालवावे,फकिराला संसारी माणसांच्या वेदनांची जाणीव काय होणार असा टोला हि त्यांनी यावेळी लगावला.वेगवेगळया सरकारी खात्यांमध्ये अडीच लाख जागा रिक्त आहेत.माञ सरकारने भरतीवर बंदी आणली आहे.नुसती मन की बात अन चाय पे चर्चा करुन चालणार नाही तर पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करायला हवेत तसेच या सरकारने दुष्काळ जाहिर करावा असेही पवार यांनी सांगितले.

या प्रसंगी खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात,उपाध्यक्षा अर्चना घारे, शिरुर-हवेलीचे माजी आमदार अशोक पवार, माजी आमदार पोपटराव गावडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, माजी अध्यक्ष सुरेश घुले, प्रवक्ते विकास लवांडे, जिल्हा बॅंकेच्या संचालिका डॉ. वर्षा शिवले, दुधसंघाच्या जिल्हाध्यक्ष वैशाली नागवडे, जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण, जिल्हा बॅंकेचे संचालक निवृत्ती अण्णा गवारे, जि.प.सदस्य राजेंद्र जगदाळे, शिरुर बाजारसमिती संचालक विजेंद्र गद्रे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवि काळे, शिरुर शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, जाकिरखान पठाण,घोडगंगेचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे, पंचायत समितीचे सभापती विश्वास कोहोकडे, उपसभापती जयमाला जकाते, माजी उपसभापती मोनिका हरगुडे, घोडगंगा उपाध्यक्ष संतोष रणदिवे, घोडगंगा संचालक नरेंद्र माने,बाबासाहेब फराटे, प्रशांत होळकर, प्रा. सुभाष कळसकर, दिलीप मोकाशी,उत्तम सोनवणे,मनिषा सोनवणे, मांडवगणचे सरपंच शिवाजी कदम, वडगावचे सरपंच निर्मला ढवळे, माजी सरपंच लतिकाताई जगताप,सिमा फराटे, प्रतिभा बोञे, सुरेखा जगताप आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजित पवार यांचे संपूर्ण भाषण पहा:

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या