रांजणगाव गणपती येथे CNG पंपाचे उदघाटन! (Video)

Image may contain: car and outdoor
रांजणगाव गणपती, ता. 11 ऑक्टोबर 2018: रांजणगाव गणपती येथे असलेल्या साई गणेश पेट्रोलियम येथे आज (गुरुवार) CNG पंपाचे उद्घाटन झाले. उद्घाटनानंतर CNG भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

शिरूर तालुक्यात प्रथमच CNG पंप झाल्यामुले तालुक्यासह नगर जिल्ह्यातील वाहनधारकांना मोठा फायदा होणार आहे. पुणे-नगर महामार्गावर वाघोली नंतर औरंगाबाद पर्यंत कोणताही CNG पंप नाही. रांजणगावमधील साई गणेश पेट्रोलियम येथे CNG पंप झाल्यामुळे वाहनधारक सुखावले आहेत. शिरूर येथील मारुती कंपनीच्या शोरूमशी संपर्क साधला असता सदर पंप चालू होणार आहे, असे परिसरातील ग्रामस्थांना समजल्यानंतर CNG मोटारी खरेदी करण्याच्या मागणीत दपटीने वाढ झाली आहे.

Image may contain: 14 people, people smiling, people standing, car and outdoor
रांजणगाव येथील साई गणेश पेट्रोलियम येथे इंडियन ऑइलने हा उपक्रम चालू केला आहे. याबाबत पंपाचे मालक तुषार काळे यांनी सांगितले की, 'पेट्रोल व डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. यासाठी सर्वसामान्यांना CNG परवडतो. आज पर्यंत फक्त शहरी भागात मिळणारा CNG ग्रामीण भागात उपलब्ध झाला आहे. यामुळे CNG मोटारी घेण्याचे प्रमाण वाढेल. सदर पंपाचे उदघाटन कोणत्याही मान्यवरांच्या हस्ते न करता ते ग्राहकांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आलेल्या CNG वाहन धारकांनी सामूहिक फित कापून उद्घाटन केले.'

यावेळी सुरूची डेअरीचे कार्यकारी संचालक भैरवनाथ काळे, इंडियन ऑइलचे पुणे विभागाचे प्रमुख सुब्रत रथ, पुणे नॅचरल गॅसचे उपाध्यक्ष श्रीधऱ ताम्बरपणी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या