MIDC मध्ये टगेगिरी करणाऱयांवर होणार कारवाई (Video)

Image may contain: 3 people, people sitting, people standing and childरांजणगाव गणपती, ता. १७ अॉक्टोबर २०१८ (प्रतिनीधी) : पुणे जिल्हयातील औद्योगिक पट्ट्यातील कंपन्यांना सुरक्षा देण्यास सर्वोच्च प्राधान्य असून उद्योगांमध्ये ञास देणा-या गुंडांची तसेच बिनकामी फिरत टगेगिरी करणा-यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांनी बोलताना सांगितले.
रांजणगाव औद्योगिक वसाहतीत कंपन्यांच्या अधिकारी वर्गाशी पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांनी बैठक घेउन संवाद साधला. तसेच उदयोगात येणा-या अडचणी व समस्या या वेळी अधिकारी वर्गाकडून जाणून घेतल्या.
यावेळी बोलताना पोलीस अधिक्षक पाटील म्हणाले कि, औद्योगिक वसाहतीतील सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले असुन रांजणगाव व परिसरातील उद्योगांमध्ये कसलाही मोठा गुंड ञास देत असेल तर निर्भिडपणे समोर येउन पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिका-यास भेटुन तक्रार द्यावी. टेंडर, कॉन्ट्रॅ्क्ट तसेच खंडणीची मागणी केली तर अशा गुंडांविरोधात एमपीडीए व मोक्का कायद्यांतर्गत कडक कारवाई केली जाईल. या पुर्वी साता-यात अशा गुंडांवर कडक कारवाई केली आहे.

एमआयडीसीत जर कोणी कंपन्यांमध्ये विनाकारण ञास देत असेल तर अशांची हयगय केली जाणार नाही. रांजणगाव एमआयडीसी व परिसरातील कंपन्यांमध्ये विनाकारण बिनकामाचा प्रवेश करणा-यांवर मुंबई पोलीस कायद्यान्वये या पुढे गुन्हे दाखल केले जातील. यावेळी पाटील यांनी रांजणगाव वसाहतीतील सर्व अनधिकृत टप-या हटविण्याचे आदेश प्रशासनास दिले. वाघोली-शिक्रापूर येथील ट्रॅफिक च्या मुद्दयावर बोलताना फक्त ट्रॅफिक साठी एक सहायक पोलीस निरीक्षक व ३० पोलीस कर्मचारी नेमणार असल्याचे तसेच रांजणगाव पोलीस स्टेशनला गस्तीसाठी दोन वाहनेही लवकरच देत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

या बैठकिला अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. संदिप पखाले, पोलीस निरीक्षक मनोज यादव, सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम, पोलीस उपनिरीक्षक शुभांगी कुटे, एमआयडीसी कंपनीचे प्रमुख, अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या