शिरुर तालुक्यातील दोन सुपुञांना उच्च पदावर पदोन्नती

करडे/तळेगाव ढमढेरे, ता. २० अॉक्टोबर २०१८(प्रतिनीधी) : शिरुर तालुक्यातील दोन पोलीस अधिका-यांना उच्च पदावर नुकतीच पदोन्नती मिळाली असुन या पोलीस अधिका-यांचे शिरुर तालुक्यातुन अभिनंदन केले जात आहे.

Image may contain: 1 person, hatमहाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने नुकतेच शासन आदेश काढला असुन यात सुमारे २९ पोलीस अधिका-यांना 'अ' संवर्गातील पदावर पदोन्नती पदस्थापना जाहिर केली आहे. या मध्ये शिरुर तालुक्यातील दोन अधिका-यांना स्थान मिळाले आहे.

खंडेराव अप्पासो धरणे, पोलिस अधिक्षक
शिरुर तालुक्यातील खंडेराव अप्पासो धरणे यांना सहायक पोलीस आयुक्त ते पोलीस अधिक्षक अशी पदोन्नती मिळाली आहे. खंडेराव धरणे यांनी सातारा येथे उपविभागीय  पोलीस अधिकारी म्हणुन काम केले असुन त्यांच्या काळात सातारा जिल्हयात सावकारीच्या केसेस मोठ्या प्रमाणावर केल्या असुन ६ जणांवर मोक्का लावण्यात आला आहे.तसेच तडीपारीच्याही कारवाया  मोठ्या प्रमाणावर केल्या आहेत.साता-यातील वाई येथील कथित बोगस डॉक्टर संतोष पोळ याने थंड डोक्याने सहा खुनांनी संपुर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या हत्याकांडाच्या तपासात महत्वाची भुमिका धरणे यांनी बजावली आहे. सातारा येथुन बदली झाल्यानंतर भिवंडी येथे सहायक पोलीस आयुक्त पदावर त्यांची नेमणुक करण्यात आली होती. या ठिकाणी अतिसंवेदनशील समजल्या जाणा-या परिसरात गणपती, मोहरम, नवराञ आदी सण उत्सवात कायदा सुव्यवस्था व शांतता राखण्याची महत्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडली असुन गडचिरोली येथील नक्षलवादी प्रभावित क्षेञात सुमारे ३ वर्षे कामाचा ठसा उमटविला आहे. खंडेराव धरणे यांची राज्य मानवी हक्क आयोग,मुंबई येथे पोलीस अधिक्षक पदावर पदोन्नती झाली असुन त्यांचे शिरुर तालुक्यात सर्वञ अभिनंदन करण्यात येत आहे.

Image may contain: 1 person, standingविक्रांत देशमुख अप्पर पोलीस अधिक्षक पदावर
शिरुर तालुक्यातील करडे येथील सुपुञ विक्रांत देशमुख यांची पोलीस उपअधिक्षक पदावरुन अप्पर पोलीस अधिक्षक पदावर पदोन्नती झाली आहे. विक्रांत देशमुख हे सध्या दहशतवाद विरोधी पथकात पोलीस उपअधिक्षक पदावर कार्यरत होते.त्यांनी पुणे येथे उच्च शिक्षण घेतले असुन पोलीस सेवेत जालना,औरंगाबाद आदी ठिकाणी काम पाहिले आहे. अतिशय महत्वाच्या तसेच गुंतागुंतीची प्रकरणे त्यांनी हाताळली असुन दहशतवाद विरोधी पथकात उत्कृष्ट कामाचा त्यांनी ठसा उमटविला आहे. देशमुख यांना दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस उपअधिक्षक पदावरुन अप्पर पोलीस अधिक्षक, अकोला येथे पदावर पदोन्नती मिळाली आहे. त्यांचे करडे  ग्रामस्थ तसेच शिरुर तालुक्यातील नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.  

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या