करडेकरांनी जागविल्या माणुसकीच्या संवेदना...

Image may contain: one or more people, people standing, tree and outdoorकरडे, ता. २१ अॉक्टोबर २०१८(प्रतिनीधी) : अपघात घडलाय..जखमी रस्त्यावर गंभीर अवस्थेत पडलाय..सोबत महिला अन् चिमुरडी जखमी अवस्थेत रडतेय..पण पुढे काय होतं ? कोण मदत करतं ?

आज रविवार (दि.२१) सकाळची वेळ. करडे गावानजीक दुचाकीवर चाललेल्या व्यक्तीचा अपघात झालेला. सोबत दुचाकीवर असलेल्या महिलेच्या कडेवर चिमुरडी मुलगी. महिलेच्या तोंडातून रक्त येतयं तर चिमुरडीलाही जखमा झाल्यात. दुचाकी चालवणा-या व्यक्तीला डोक्याला अन पायाला गंभीर मार लागलाय. जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला तो व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडलाय. बघ्यांची ही गर्दी जमू लागते. तितक्यात करडे गावातील काही युवक धावून येतात. जखमीची अवस्था पाहुन यातील काही युवकांनी अॅम्ब्युलन्सला फोन केला तर काहींनी त्या महिलेला तत्काळ मदत मिळेपर्यंत धीर देण्याचे काम केले. यावेळी अॅम्ब्युलन्स आल्यानंतरही यातील काही तरुणांनी तत्काळ जखमी व्यक्तीला गाडीत बसवण्यासाठी मोठी मदत केली.

अपघात झाल्यानंतर अनेकदा मदतीसाठी पुढे कोणीच येत नसल्याचे वारंवार दिसते. परंतु करडे गावातील युवकांनी अपघातातील जखमींना तातडीने मदत करत माणुसकीच्या संवेदना पुन्हा जाग्या असल्याचे यानिमित्ताने दाखवून दिले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या