पाचर्णेवस्ती आणि होमाचीवाडी यांना वीज मिळेल का?

Image may contain: sky, cloud, outdoor and natureतळेगाव ढमढेरे, ता.२३ अॉक्टोबर २०१८ (जालिंदर आदक) :  शिरूर तालुक्यातील टाकळी भिमा गावातील पाचर्णेवस्ती होमाचीवाडी येथील विद्युत रोहित्रे तब्बल अंदाजे सप्टेंबर महिन्या पासून नादुरुस्त अवस्थेत असून तेथील नागरिक अंधारात असलेली घटना घडली आहे. सबंधित वीजवितरण विभागाचे अधिकारी मुग गिळून गप्प बसले आहेत नागरिक वीज मिळेल का? या आशेवर थांबले आहे.

टाकळी भिमा येथील पाचर्णेवस्ती आणि होमाचीवाडी येथील विद्युत रोहित्रे गेल्या १३ सप्टेंबर पासून दिवसापूर्वी नादुरुस्त अवस्थेत असून मधल्या दोन दिवस वीज आली परंतु पुन्हा बिघाड झाल्याने येथील नागरिकांची गैरसोय झालेली असताना वीजवितरण अधिकारी असल्याही प्रकारची हालचाल करताना दिसत नसल्याचे चित्र असून नागरिक व शेतकरी हवाईदिल झाले आहेत याच विद्युत रोहित्रावरून होमाचीवाडी, पाचर्णेवस्ती, येथील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे तसेच शेतीला जोडधंदा करू पाहणारा दुग्धव्यवसाय अडचणीत येत आहे दुपत्या जनावरांना पाण्याची सोय नसल्याने त्यांचा उत्पादनावर परिणाम होत असल्याचे शेतकरी सांगत आहे तसेच याच विद्युत रोहित्रावरून शेतातील पिकांना शेतकरी पाणी देण्यासाठी वापर करत आहे परंतु ऐन पावसाळ्यात पाण्याची टंचाई भासू लागली आहे पिकांना पाणी कमी पडल्याने त्याचा तोटा शेतकर्यांना सहन करावा लागणार आहे.

टाकळी भिमा गाव हे भिमा नदी किनारी असल्यामुळे सर्वभागात बागायत आहे पिकांना पाणी आहे परंतु वीज नाही अशी परिस्थिती झाली आहे पाचर्णेवस्ती व होमचीवाडी येथील नागरिक वेळोवेळी पाठपुरावा करत आहे मात्र त्यांना यश येईना अश्या परीस्थित आमदार खासदार वरवरची आश्वासन देऊन नागरिकांना खुश करतात परंतु आजही जास्त दिवस वीज नसलेले गाव टाकळी भिमा गावातील वाड्यावस्तीवरील नागरिकांना आपण कोणत्या जमान्यात राहतो याचा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.तळेगाव ढमढेरे येथील वीजवितरण कार्यालयातील कनिष्ठ अभियंता ए.बी. अलदार यांना संपर्क केला असता त्यांनी फोन घेतला नाही त्यांच्या वरिष्ठ उपकार्यकारी अभियंता यांना फोन केल्यास संपर्क होऊ शकला नाही.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या