दोन तोंडाच्या वासराला जन्म देऊन गाईने सोडला प्राण

No automatic alt text available.
शिरूर, ता. 23 ऑक्टोबर 2018: एका गाईने दोन तोंडं असलेल्या वासराला जन्म दिला मात्र दुर्देवाने वासराला जन्म दिल्यानंतर गाईने प्राण सोडले. वासरू मात्र सुस्थितीत असून, हे दुर्मीळ वासरू पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे.

शिरूर शहरातील लाटे आळी परिसरातील कदीर बेपारी यांची पाळीव गाई दोन दिवसांपूर्वी प्रसूत झाली. प्रसूतीवेळी जन्मलेल्या वासराला दोन तोंडे, चार डोळे, दोन कान असून, बाकी अवयव सर्वसाधारण आहेत. मात्र, या प्रसूतीवेळी गाईला त्रास झाला व प्रसूती वेदना असह्य झाल्याने वासराला जन्म दिल्यानंतर ती मरण पावली.

वासराचा रंग पांढरा आहे. परंतु दोन डोक्‍यांचे वजन झेपत नसल्याने ते फारसे उभे राहू शकत नाही. कदीर बेपारी यांच्या कुटुंबातील सदस्य व त्यांचा मुलगा अर्शद हे बाटलीने दूध पाजून या वासराची काळजी घेत आहेत. या वासराचे चारही डोळे उघड्या अवस्थेत आहेत. दोन डोकी एकमेकांना जोडलेली असल्याने दोन्ही बाजूला दोनच कान आहेत. दोन्ही तोंडे स्पष्टपणे दिसत असून, शरीराच्या मानाने ही डोकी मोठी असल्याने आधार देऊनच या वासराला उभे केले जात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या