प्रा. पांडुरंग बरकले यांना पी.एच.डी जाहिर

Image may contain: 1 person, closeupपिंपरखेड, ता.२६ अॉक्टोबर २०१८ (आबाजी पोखरकर) : पिंपरखेड (ता. शिरूर) येथील श्रीदत्त विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रा.पांडुरंग बरकले यांना नुकतीच पी.एच.डी जाहिर झाली आहे.

मुळचे चांडोह गावचे सुपुत्र आणि एस एन डी टी महिला विद्यापीठ मुंबईच्या कला महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक, विभागप्रमुख आणि अंतर्गत गुणवत्ता आश्वासन कक्षाचे समन्वयक प्रा.पांडुरंग विठ्ठल बरकले यांना मुंबई विद्यापीठाकडून इंग्रजी साहित्य (English literature) या विषयामधून पीएच.डी पदवी  जाहिर झाली आहे. त्यांनी"पॉलिटीकिंग दि आदर:दि इश्यूज ऑफ नेशन जेंडर अँन्ड एथनीसीटी इन सिलेक्ट नॅरेटिव्ह्ज ऑन सार्क कंन्ट्रीज" या  विषयावर आपला संशोधन प्रबंध सादर केला. त्यांना डॉ. माधवी निकम आणि डॉ.सुधीर निकम यांचे मार्गदर्शन लाभले.

कला शाखेत शिक्षण घेऊन इंग्रजी विषयाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख असलेले पांडुरंग बरकले हे शेतकरी कुटुंबातील असुन फर्स्ट जनरेशन लर्नर आहेत.प्रा.बरकले यांच्या शिक्षणामध्ये त्यांचे ज्येष्ठ बंधू डॉ. दादाभाऊ बरकले आणि मामा श्री. ज्ञानेश्वर वाळुंज यांनी मोलाची भूमिका बजावली.पिंपरखेड परिसरातील पहिले पीएच.डी धारक असल्याने परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव, श्री दत्त विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संस्था तसेच त्यांचे सहकारी, मित्रवर्ग, विद्यार्थी, आप्तेष्ठ व नातेवाईकांनी त्यांचे अभिनंदन केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या