शिरूर तालुक्यातील रस्त्यांच्या बाबतीत कितीही 'बोंबला'

Image may contain: textशिरूर, ता. 29 ऑक्टोबर 2018 : शिरूर तालुक्यातील रस्त्यांच्या बाबतीत कितीही बोंबला आम्हाला काही फरक पडत नाही, या मतचाचणीवर नेटझन्सनी आपले मत नोंदविताना काही फरक पडणार नसल्याचे म्हटले आहे.

शिरूर तालुक्यातील विविध रस्त्यांची चाळण झाली आहे. सोशल मीडियावरून अनेकदा आवाज उठविल्यानंतरही प्रशासन, राजकीय नेते दखल घेत नसल्याचे दिसत आहे. विविध वर्तमान पत्रांमधून केवळ रस्ता होणार असल्याच्या बातम्याच प्रसिद्ध होताना दिसतात. पुढे मात्र, काही होते की नाही? या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीत राहते.

शिरूर तालुक्यातील नेटिझन्सनी रस्त्यातील खड्ड्यांचे अनेक छायाचित्र सोशल मीडियावर यापुर्वी अपलोड करून आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु, रस्त्यांकडे लक्ष देण्यासाठी कोणालाच वेळ नाही. यामुळे नेटिझन्स खड्ड्यांचे उत्तर मतदानादरम्यान दाखवून देतील.

शिरूर तालुक्यात अग्रेसर असलेल्या www.shirurtaluka.com ने गेल्या आठवड्यात पुढीलप्रमाणे मतचाचणी घेतली होतीः
'शिरूर तालुक्यातील रस्त्यांच्या बाबतीत कितीही 'बोंबला' आम्हाला काही फरक पडत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे आपणास वाटते?
उत्तरः होय 80 टक्के, नाही 20 टक्के.

या मतचाचणीवरूनच रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत व संबंधिताविरोधात नाराजी पहायला मिळते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या