निलसागर मिसळ...तुम्ही कधी अनुभलीय का? (Video)

शिरुर, ता.२९ अॉक्टोबर २०१८ (प्रतिनीधी) : मिसळ म्हटलं कि सर्वप्रथम आठवतो तो झणझणीत रस्सा अन खमंग टेस्ट.. परंतू शिरुर शहरात हि मिसळ सध्या तरुणाई मध्ये जोरदार प्रसिद्ध होतेय.
शिरुर शहरात सी.टी बोरा कॉलेज रस्त्यावर निलसागर हॉटेल येथे मिसळ मिळतेय परंतु त्यात असलेल्या पदार्थांमुळे तरुण अन ग्राहकांमध्ये जोरदार मागणी होत  आहे. याविषयी अधिक माहिती देताना या हॉटेलचे प्रमुख सागर बोरकर व दिपाली बोरकर यांनी सांगितले कि, पुणे शहरात मिसळीची मागणी होत असते. त्याप्रमाणेच ग्राहकांच्या गरजा लक्षात घेउन पुणे शहराप्रमाणेच शिरुर शहरातील शिरुरकरांसाठी अनोख्या पद्धतीची मिसळ देण्याचा प्रयत्न केला जातो.

शिरुर शहरात ग्राहकांची मागणी लक्षात घेउन मिसळीमध्ये चांगल्या दर्जाचे तेल वापरले जाते. शेव, झणझणीत रस्सा, ताजे पदार्थ, कांदे, दही, गुलाबजामून व किसलेले खोबरे, पापड, मटकी अन ठसकेदार हिरवी मिरची अशा पद्धतीने सजावट केलेली मिसळीची स्पेशल डिश दिली जाते.

या मिसळीविषयी अधिक माहिती देताना दिपाली व सागर बोरकर यांनी सांगितले कि, मिसळ हाउस ला येणा-या प्रत्येकाची व आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. स्वच्छता व टापटिपपणा यांवर भर दिला जात असल्याने शिरुर करांनी या मिसळीला चांगली पसंती दिली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या